माझ्याबद्दल थोडेसे..

मी अमित चिविलकर व्यवसायाने वेबडिजायनर असून जास्तीत जास्त मराठीतून वेबसाईट बनविल्या गेल्या पाहिजेत यासाठी सतत प्रयत्न करत राहणार आहे. दर्जेदार मराठी वेबसाईटची सध्या कमी आहे तो दर्जा देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असतो.

मी वेबमाझा.कॉम नावाचे ई-मॅगझीन चालवतो. मराठी टॅलेंट आणि महाराष्ट्रातील यशस्वी लोकं, संस्था किंवा संघटनांसाठी व्यासपीठ तयार करुन देणे हा माझा उद्देश आहे. हे ई-मॅगझीन दरमहिन्याच्या १ आणि १६ तारखेला अपडेट करत असतो. माझ्या या वेबसाईटला आपण नक्कीच भेट द्या : www.webmajha.com

शिवसैनिक असल्याने या ब्लॉगवर शिवसेनेच्या बाजूने लिखाण केलेले आढळेल. शिवसेनाप्रमुखांबद्दल प्रचंड आदर असून त्यांनाच आदर्श मानतो.

इंटरनेटवर अनेक ब्लॉग वाचत असताना इंटरनेट, टेक्नॉलॉजी, सोशल नेटवर्किंग, वेब डिजायनिंग आणि डेवलपमेंट या विषय पाहण्यात आले. आपल्याला माहित असेलेलं आपल्या मातृभाषेत मांडावा यासाठी हे ब्लॉग लिखाण मी पुन्हा सुरु केलेलं आहे. मी तसा काही चांगला लिहिणारा वैगेरे नाही, पण जे येते ते शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करायला नक्कीच तयार असतो.