Showing posts with label Mobile Operator. Show all posts
Showing posts with label Mobile Operator. Show all posts

Saturday, 29 January 2011

BSNL आणि Reliance ला ग्राहकांचा नकार

MNP अर्थात मोबाईल नंबर पोर्टबिलीटी सेवा या महिन्याच्या २० तारखेला सुरु झाली आणि अवघ्या एका आठवडयात काही मोबाईल ऑपरेटर्सचे पितळ उघडे पडले. ग्राहकांना मनासारखी सेवा न देऊ शकणाऱ्या कंपन्यांवर आता ग्राहकराजाने MNP ची तलवार उपसली असून भविष्यात अजूनही याचे परिणाम मोबाईल कंपन्यांना भोगावे लागणार आहेत.

ही सेवा सुरु झाल्यानंतर बीएसएनएल आणि रिलायंन्स यांच्या ग्राहकांनी खुपच मोठ्या प्रमाणात आपले ऑपरेटर्स बदलत आहेत. बीएसएनएल च्या २० हजारापेक्षा अधिक तर रिलायन्स (CDMA आणि GSM)च्या तब्बल १३ हजारापेक्षा जास्त ग्राहकांनी या कंपन्यांना दिवसा तारे दाखविले आहेत. तर मोबाईल सेवेत सतत बदल करणाऱ्या वोडाफोन या कंपनीकडे MNP अंतर्गत २० हजार ग्राहकांची भर पडली आहे.

दोन दिवसांपूर्वी द हिंदु बिझनेस लाईन ने हे आकडे प्रकाशित केले आहेत. खालील चार्ट पहा :


Thursday, 20 January 2011

Mobile Number Portability अर्थात ग्राहकराजाचा हक्क

आजपासून मोबाईल वापरणारासुद्धा मोबाईल कंपनीसाठी ग्राहकराजा म्हणूनच ओळखला जाणार आहे. मोबाईल सुविधा सुरु झाल्यापासून मोबाईल ऑपरेटर्सच्या सर्व असुविधा निमुटपणे सहन करणाऱ्या मोबाईलधारकाकडे खुद्द ट्राय ने आता हत्यार दिलेले आहे.

रिलायन्सने हिंदुस्थानात ‘मोबाईल क्रांती’ करुन स्वस्त फोन विकण्याची स्किम काढली आणि प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन दिसायला सुरुवात झाली. अन्न, वस्त्र, निवारा सोबत मोबाईल ही आणखी एक मुलभूत गरज भासू लागली.  अर्थातच याचा सर्वात जास्त फायदा मोबाईल कंपन्यांनी पाहिजे तसा घेतला. कधी किंमत युद्ध तर कधी स्वस्त फोन अशा स्किम येतच राहिल्या पण जे ग्राहक फोन वापरत आहेत त्यांच्या हिताकडे या कंपन्यांनी नेहमीच दुर्लक्ष केले. याच गोष्टीकडे पाहून ट्रायने   ‘Mobile Number Portability’ अर्थात नंबर कायम ठेवून मोबाईल कंपनी बदलण्याचे विकल्प ग्राहकांसमोर ठेवले आहे.

ही सेवा आज पासून सुरु होत असून ती वापरण्यासाठी साधे-सोप्पे प्रक्रिया आहे. ती अशी:

१. आपल्या मोबाईलच्या टेक्स्ट मेसेज मध्ये जाऊन PORT <mobile Number> असा SMS 1900 या क्रमांकावर पाठवा.
उदा. PORT 9821098210
२.  Reply म्हणून एक ८ अंकी `Unique Porting Code’ मिळेल.
३.  हा कोड मर्यादित कालावधीकरिता वापरता येतो म्हणुन युनिक पोर्टींग कोड मिळाल्यानंतर ज्या कंपनीची आपल्याला सुविधा हवीय त्यांच्याकडे आपले पुराव्याचे कागदपत्र (Address Proof, Photo ID आणि Photograph) घेऊन जायचेय.
४.   तुमच्यासाठी सेवा उपलब्ध झाल्याचे SMS ने कळविले जाईल.
५.      ४ दिवसाच्या आत तुम्हाला १९ रुपये आणि सीमकार्डची किंमत देऊन नविन कंपनीचा सीम कार्ड घ्यायचाय.
६.      नविन कंपनीसोबत किमान ९० दिवस राहणे बंधनकारक असेल. ९० दिवसानंतर पुन्हा याच पद्धतीने आपण कंपनी बदलू शकता.

अधिक माहिती

१.      तुम्ही सध्या वापरत असलेल्या CDMA (TATA, Reliance, Virgin, MTS, Garuda) यामधून कुठल्याही GSM नेटवर्कमध्ये जाऊ शकता.
२.      पोस्टपेड मधून प्रिपेड मध्ये जाऊ शकता.
३.      ही सेवा फक्त मोबाईल फोन्स साठीच आहे. लॅण्डलाईनसाठी वापरु शकत नाही.
४.      ही सेवा फक्त जिथे राहतो त्याच सर्कल मध्ये म्हणजेच समजा आपण मुंबईत आहात तर मुंबई सर्कल मध्येच वापरु शकता. महाराष्ट्र हे वेगळ्या सर्कल मध्ये येत असल्याने तिथे ही सेवा मिळणार नाही.
५.      नंबर बदलण्यासाठी मोबाईल कंपन्यांना ट्राय ने केवळ ७ दिवसाचा अवधी दिला असल्याने ही सेवा आपल्याला एका आठवड्यातच मिळणार आहे.
६.      ही सेवा यशस्वीपणे हरियाणामध्ये राबविली गेली आहे.

आपल्याला याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास आयडिया मोबाईल कंपनीच्या टॉल फ्री नंबर 1800-270-0000 इथे संपर्क साधू शकता.