गेली काही वर्षे ऑनलाइन ई-बुक वाचणाची सवयच लागून गेलीय. हल्ली काही का असोत ना, मराठी ई-बुक्स सुध्दा वाचकांसाठी उपलब्ध व्हायला लागलेत ही चांगली गोष्ट आहे.
माधव शिरवळकरांना काही वर्षे वाचतोय, किंबहुना मराठी भाषेत संगणकावर लेखन कसे करावे हे त्यांच्या लेखातूनच शिकलो. खाली दिलेले हे ई-बुक अनेक ब्लॉग आणि मराठी वेबसाइटवर पाहण्यात आलेय पण माझ्याकडे संग्रही असावे तसेच कुणी वाचले नसेल तर त्यासाठी उपलब्ध असावे म्हणून माझ्याही ब्लॉगवर ठेवत आहे.
संगणक जगत
Showing posts with label FB. Show all posts
Showing posts with label FB. Show all posts
Sunday, 6 March 2011
Friday, 4 March 2011
सोशल नेटवर्किंग साइटसाठी तुमचे युजरनेम उपलब्ध आहे का?
ब-याचदा अनेक ऑनलाइन खात्यांसाठी आपण एकच य़ुजरनेम वापरतो. काही ठिकाणी आपले युजरनेम उपलब्ध नसेल तर फुकट वेळेची बरबादी होते. तेव्हा आपल्याला हवे असलेले युजरनेम कुठल्या सोशल नेटवर्किंग साइटवर उपलब्ध आहे आपण नेमचेक.कॉम चा वापर करून शोधू शकतो. तर मग बघा तुमचे आवडीचे युजरनेम आणखी कुठे उपलब्ध आहे आणि असेल तर लगेच खाते बनवून घ्या.
Thursday, 3 March 2011
क्रिकेट विश्वचषक : नेट रन रेट काढा
विश्वचषक सामन्यांमध्ये आता चुरश यायला सुरूवात झालीय. कालच्या सामना यापूर्वी विश्वचषकात झालेल्या सामन्यांमधला सर्वात जास्त लक्षात राहणारा असेल. पुढे आता आणखी इतर छोटे संघ कसा खेळ करतात यावर स्पर्धेत कोण टिकणार कोण जाणार हे नक्की होईल. उपांत्य फेरीत जाणारा संघ कोण असेल त्यासाठी नेट रन रेट चांगला असायला हवा का? नेट रन रेट कसा काढला जातो हेच या लेखातून मला सांगायचेय.
आपण हिंदुस्थानचा नेट रन रेट काढू यात. नेट रन रेट काढताना एखाद्या संघाने स्पर्धेत किती षटकांमध्ये किती धावा काढल्या आणि समोरील संघांला किती षटकांत किती धावा काढू दिल्या (म्हणजेच खेळलेल्या प्रत्येक सामन्यांच्या रनरेटमधून काढले जाते) याची वजाबाकी करून जे उत्तर येते तेच नेट रन रेट असते. उदा. हिंदुस्थानने विश्वचषकातील दोन सामन्यांमध्ये (बांग्लादेश विरूध्द ५० षटकांत ३७० धावा + इंग्लंड विरूध्द ५० षटकांत ३३८ धावा ) १०० षटकांत ७०८ धावा केल्यात, आता ७०८ ला १०० ने भागले असता हिंदुस्थानचा स्पर्धेतील रनरेट ७.०८० असे येते. आता हिंदुस्थानविरूध्द (बांग्लादेश ५० षटकांत २८३ धावा आणि इंग्लंडने ५० षटकात ३३८ धावा) १०० षटकांत ६२१ धावा कुटल्या गेल्या म्हणजेच ६.२१० च्या रनरेटने या धावा प्रतिस्पर्धी संघाने काढल्या. आता काढलेल्या रनरेटमधून दिलेले रनरेट वजा केल्यावर हिंदुस्थानचा नेट रनरेट ०.८७० असा येतो.
विश्वचषकातील पुढील लढतीत कदाचित याची आपल्याला गरज लागलीच तर अशाप्रकारे आपल्याकडे आकडे तयार असणे गरजेचे आहे.
विश्वचषक पुन्हा वेगळे वळण घेईल..??
ICC च्या मुंगेरीलाल के हसीन स्वप्नांशी सध्या विश्वचषकातल्या ‘ब’ गटातील लिंबूटिंबू खेळताना दिसत आहेत. पिसाळलेल्या वाघासाठी पिंज-यात गरीब बिचा-या बकरीला सोडावे अगदी तसेच दोन्ही गटात तीन-तीन संघांना ठेवले होते. ‘अ’ गटात आतापर्यंत बक-यांचे लचके तोडले गेले आहेत, किंबहुना विश्वचषक रटाळ होतोय तो ‘अ’ गटातील एकतर्फी सामन्यांमुळेच! पण ‘ब’ गटात त्यामानाने तुल्यबळ सामने बघायला मिळत आहेत.
कालच्या इंग्लंड-आर्यलंड सामन्यात विक्रमी टारगेट गाठून आयरीश खेळाडूंनी या वर्षीही मोठ्या संघांना बाहेर काढण्याचे काम करणार आहोत असा सुतोवाच दिलाय. ३२९ धावांचं लक्ष्य आजपर्यंत कुठल्याही संघाला विश्वचषकात गाठता आलेले नाही. परवा इंग्लंड जिंकली असती तर तेव्हाच हा विक्रम होऊ शकला असता, पण नियतीच्या मनात फार वेगळे होते, जो विक्रम जवळपास त्यांच्या नावावर होणार होता तोच त्यांच्या विरोधात झालाय.
आयर्लंडने विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठे लक्ष्य पार तर केलेच सोबत केवीन ओब्रायनने विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात जलद शतक साजरे करून दुहेरी विक्रम केला. जवळ जवळ ३० षटकांपर्यंत इंग्लंडच्या हातात असलेला सामना आयर्लंडसारख्या कसोटी दर्जाही नसलेल्या संघाने आरामात खिशात टाकला हे विश्वचषकात रोमांचक लढती होत असल्याचे दाखवतेय. हिंदुस्थानव्यतिरिक्त इतर सामन्यांकडे पाठ फिरवणा-या प्रेक्षकांना सर्वच लढती बघण्यासाठी नक्कीच आकर्षित करतील अशी अपेक्षा करायला हरकत नसावी.
आता ‘ब’ गटातील लढती जिंकू किंवा मरू अशाच होणार. गटातील ७ पैकी ६ संघांनी प्रत्येकी एक विजय मिळविला आहे, तर हिंदुस्थान आणि इंग्लंड लढत बरोबरीत सुटल्याने या दोन संघांकडे ३-३ गुण आहेत. या गटातील पुढील फेरीसाठीचे ४ संघ कोण असतील हे सांगणे दिवसेंदिवस जास्त कठीण होऊन बसत आहे. हिंदुस्थान, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या तीन संघाचे पुढे जाणे ग्रहीत धरले जात होते पण कालच्यासारख्या लढती बघून असे ठामपणे सांगणे कठीण आहे. चौथा संघ हा नेट रन रेटनेच पुढे येईल असे दिसतेय.
गेल्या वेळेस हिंदुस्थान आणि पाकिस्तान पहिल्या फेरीत बाद झाल्याने उडालेला फज्जा पाहता यावेळेस मोठे संघ पुढे जावेत यासाठी कसोटी दर्जा नसलेल्या संघांच्या कत्तली करायच्या ICC च्या मनसुब्यांवर पाणी नाही फिरले म्हणजे झाले.
Wednesday, 2 March 2011
वेबमाझा.कॉम - मार्च महिन्याचे अपडेट
मागचे अनेक दिवस ब्लॉग अपडेट केलेला नाही. इतर कामात व्यस्त असल्यामुळे म्हणणार नाही, कारण कामातून वेळ काढून अशा गोष्टी केल्या पाहिजेत असे मनापासून वाटते. असो उगाच यात वेळ नाही घेत.
वेबमाझा यावेळची अपडेट तशी एक दिवस उशीरा करतोय. वेबसाईटचे फायनल डिजाइन पूर्ण व्हायला वेळ गेल्याने हा वेळ झाला. यावेळेस वेबमाझावर मराठीतील एका प्रगत तंत्रज्ञानाने भरपूर अशा मानबिंदू.कॉम बद्दल मी स्वत: लिहीले आहे. काही ठिकाणी योगेशने माहिती दिलीय त्यासाठी योगेशचे आभार मानतो. ‘आम्ही शिल्पकार उद्याचे’ हे मानबिंदूचे ब्रिदवाक्य आहे. त्यानुसार मराठी कलाकारांसाठी ही वेबसाईट काम करतेय. वेबसाईटवरील माहिती ही अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत मांडलेली आहे. त्यामुळे वाचकांनाही ही वेबसाईट खुप आवडतेय.
वेबमाझावर यावेळेस मानबिंदू यासाठीच कारण योगेशची मेहनत जवळून पाहिलेल्यांपैकी मी एक आहे. खुप चांगल्या पगाराची, चांगल्या हुद्दयाची नोकरी सोडून आज योगेश फुलटाईम या वेबसाईटला देत आहे. मला योगेशबद्दल मुळीच सांगायचे नाही पण त्याच्या मेहनतीचा उल्लेख लेखामध्ये न करण्याचे त्यानेच सांगितले होते म्हणून ब्लॉगवर चान्स मारला.
असो, मानबिंदूचे यावेळेचे विशेष हेच की, आता आपण मानबिंदूवरून पैसे सुध्दा कमावू शकतो. तुमची वेबसाईट, ब्लॉग किंवा तुमच्या फेसबुक खात्यावरुनही हे शक्य आहे. मानबिंदूवरील ‘उत्पन्न मिळवा’ मध्ये याची सविस्तर माहिती आहे. आपण जरूर या आपल्या मराठी साईटवरील अनोख्या संधीचा फायदा घ्या.
आम्ही शिल्पकार उद्याचे या लेखाची लिंक खाली देत आहे :
Sunday, 20 February 2011
बांग्लादेशला आपण चिरडायला हवे होते
काल आपण बांग्लादेशवर एक मोठा विजय मिळवून विश्वचषकाची सुरूवात अगदी दणक्यात केलेली आहे. जणू १७ फेब्रुवारीचा उद्धाटन सोहळा अजून संपला नव्हता. विरूने मागच्या विश्वचषकाचा वचपा काढायचा होता तो अशा प्रकारे असेल याची कुणीही कल्पना केलेली नसेल. विराट कोहलीबद्दल काही न बोललेले बरे आहे, हा गडी एकदिवसीय सामने खेळायला लागल्यापासून विकेटवर सेट झालेला आहे. विराटने मागच्या २०१० वर्षात ९९५ धावा केल्यात आणि या वर्षाची सुरूवात त्याने दक्षिण आफ्रिकेतून केलेली आहे.
हा विश्वचषक हिंदुस्थानच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. सचिनचा शेवटचा विश्वचषक असल्याने तो सचिनसाठी जिंकला जावा अशी तमाम हिंदुस्थानवासियांची भावना आहे, आणि विरूच्या खेळीतून हे स्पष्ट झाले. यापूर्वी विश्वचषक आयोजक देश स्पर्धा जिंकत नसत, पण १९९६ला श्रीलंकेने हे खोडून काढलेय. मागचा उपखंडातील विश्वचषक श्रीलंका जिंकू शकते तर आता आपणही जिंकलोच पाहिजे, असे म्हणणे चुकीचे नाही.
काल सकाळी वर्तमानपत्रातील विश्वचषकाचे बांग्लादेशाविरूध्दच्या २००७ च्या सामन्याबाबत लिहिलेले होते. बांग्लादेशाविरूध्दची हि चिड गेली ४ वर्षे प्रत्येक हिंदुस्थानींच्या मनात जखम करून बसली होती, या विश्वचषकात ही संधी उद्घाटनाच्या सामन्यात चालून आली. अपेक्षेप्रमाणे फलंदाजीमध्ये आपण बांग्लादेशाला अक्षरश: बुकलून काढलेले आहे. एखाद्या सामन्यात ३७० धावा काढणे हे कधीच सोप्पे नसते. पण तरीही विजयाची किमान अपेक्षा १०० धावांची होती ती काही पूर्ण करू शकलो नाही. विजय हा विजय असतो, मग तो १ धावेने का असे ना विजयाचे महत्व कधीच कमी जास्त नसते. असो आपली गोलंदाजी हा कच्चा दुवा आहेच, आणि खिशात ३७० धावा असताना अशा चुका सुधारण्याची संधी नक्कीच आहे.
पहिला सामना जिंकून आपण विश्वचषकाची सुरूवात खुप चांगली केलेली आहे. आता पुढेही चांगला खेळ करून विश्वचषक जिंकावा यासाठी आपल्या संघाला मनापासून शुभेच्छा!
Monday, 14 February 2011
झटपट फाईल शेअर करा
ईमेलमधून साधारणपणे १० एम.बी.ची फाईल आरामात पाठवता येते. पण जेव्हा त्यापेक्षा मोठी फाईल पाठवायची असते तेव्हा शोधाशोध सुरू होते. फाईल शेअरींग किंवा फाईल स्टोरेजसाठी अनेक वेबसाईटस आहेत.
Ge.tt ही इन्स्टंट फाइल पब्लिशींग आणि शेअरींग सेवा आहे. इथून आपण कितीही मोठी फाइल अपलोड करतानाच समोरील व्यक्तीसोबत शेअर करू शकतो. फाइल अपलोड होतानाच समोरील व्यक्ती तिच फाइल डाऊनलोड करायला सुरू करु शकते.
मग पहा हि सेवा वापरून! आणि कृपया आपला अनुभव इथे शेअर करायला विसरु नका!
Wednesday, 9 February 2011
मिडीयाला आत्मपरीक्षणाची गरज आहे
काही वर्षापासून मिडीया हा सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. अनेक घटनांची माहिती घरबसल्या मिळत असल्याने देशात वृत्तचित्र वाहिन्यांना लोकांनी डोक्यावर उचलून धरले. एका इंग्रजी चित्रपटात एक डायलॉग आहे, ‘जेव्हा शक्ती मिळते, तेव्हा जबाबदारीही येते’. आज आपल्याकडची मिडीया याच्या परस्परविरोधी वर्तन करताना दिसतेय. एखाद्या संघटनेला, व्यक्तीला किंवा समुहाला टारगेट करून बातम्या बनविणे हा यांचा धंदा बनलेला आहे. अर्थात चांगले पत्रकार नाहीतच असे मुळीच म्हणायचे नाही.
मिडीया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटला जातो पण ज्याप्रमाणे राजकारणी मोकाट सुटू लागले अगदी तशीच मिडीयासुध्दा आज मोकाट सुटलेली आहे. कधी, कुठे, काय दाखवायचे याचे भान नसलेले काही पत्रकार जेव्हा नैतिकतेची भाषा करतात तेव्हा हसावे की रडावे तेच कळत नाही.
हल्लीच अजीत पवार यांनी मिडीयासाठी दंडुक्याची भाषा केलीय. जनतेलाही तसेच वाटते की मिडीयावर कुणाचे तरी नियंत्रण असले पाहीजे. कुठल्याही ‘सी ग्रेड’ चित्रपटाप्रमाणे काही दृष्ये दाखवताना हे कधीच काही विचर करत नाही का? की टीआरपी साठी हे आता काहीही करायला तयार आहेत? केवळ पैसा आणि टीआरपी याचसाठी असे सगळे चालणार असेल तर अजीत पवार चुकीचे बोलले असे मुळीच वाटत नाहीत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे स्वत: एक पत्रकार असताना अनेकदा पत्रकारांवर तुटून पडतात, म्हणून जवळजवळ सर्वच चॅनेलनी शिवसेनेवर अघोषीत बहिष्कार टाकलेला आहे. शिवसेनेच्या चांगल्या गोष्टी नकारात्मक पध्दतीने दाखवून पत्रकार आपल्याच प्रोफेशनशी नकळत बेइमानी करत आहेत. दोनच दिवसांपूर्वी शहिद उन्नीकृष्णनच्या काकांनी शहिदांना न्याय मिळत नाही म्हणून जाळून स्वत: ला जाळून घेतले आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. ही खरं तर खुप मोठी घटना आहे. पण आमचे पत्रकारांना याबद्दल दखल घ्यावेसे वाटले नाही. एखादी मोठी घटना घडते आणि मिडीयामध्ये येत नाही तेव्हा लोकांनाही अशा घटना समजत नाहीत. याला जबाबदार कोण?
मिडीयाला बोलले किंवा हल्ला झाला की उगाच थिल्लर चाळे करण्यापेक्षा अशा घटना का घडतात हे एकदा मिडीयावाल्यांनीच तपासावे. इतरांना सल्ले देणे सोपे असते पण स्वत: आचरणात आणणे कठीण असते.
Tuesday, 8 February 2011
माघी गणेशोत्सव : छायाचित्र
आमच्या गावी म्हणजेच रानवली (श्रीवर्धन) येथे दरवर्षी माघी गणेशोत्सव अतिशय जल्लोषात साजरा केला जातो. परंतु या वर्षीचे प्रमुख आकर्षण होते ते म्हणजे लिटील चॅम्प्स मुग्धा आणि रोहित. याच कार्यक्रमाचे छायाचित्र श्री. मंगेश निंबरे यांनी पाठविले तेच आज ब्लॉगवर ठेवत आहे.
Wednesday, 2 February 2011
जिवंत नागरीकांची प्रतिक्रिया अशीच असू शकते...
ट्युनेशिया, येमेन नंतर आता इजिप्तमधील जनतेने सरकारविरोधात उठाव केला आहे. या देशांमधील नागरीकांच्या एकीला खरे तर सलाम केले पाहिजे. गेली अनेक वर्षे सत्तेत असलेल्या हुस्नी मुबारक यांच्या विरोधातील बंड जवळजवळ यशस्वी झाल्यासारखेच आहे. कालच हुस्नी मुबारक यांनी यापुढील निवडणूकांमध्ये सहभाग न घेण्याचे जाहिर केले आहे. जनतेसमोर हे हुकूमशहा झुकत असताना आमच्या जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचे बडविणा-या देशातील जनतेच्या मनातही असा विचार येत असेल का?
आपल्या देशात लोकशाही आहे, इथले सरकार हे लोकांनी निवडून दिलेय हे सत्य आहे. परंतु लोकांना त्यांचे अधिकार जाऊ द्या, साधे दोन वेळचे पोट भरण्याची सोय तरी आहे का? हिंदुस्थान हा देश गरीब नक्कीच नाही. २०२० मध्ये आपला देश जागतिक महासत्ता असणार आहे, आपली जीडीपी ग्रोथ सतत वाढत असल्याचे आपले पंतप्रधान सांगत असतात. जर पुढच्या ९ वर्षात आपण आर्थिक महासत्ता बनणार असू तर त्यात तळागाळातल्या गरीब जनता असेल की नाही?
जीडीपी ग्रोथ किंवा सरकार जे आता भरारीचे दाखले देतेय यातले देशातील सर्वसामान्य जनतेला काहिच कळत नाही. १२-१२ तास काम करुन महिना रू.२०००-५००० कमावणारी जनता आजच्या महागाईसमोर पार कोसळून गेलीय, कधी कांदा, कधी टॉमेटोचे भाव वाढतात. पेट्रोलचे भाव तर आमावस्या-पोर्णिमेला वाढत आहेत. तरी सरकारचे मंत्री महागाई असल्याचे मान्य करीत नाहीत.
आमच्या देशातील जनतेच्या हाती मताचे हत्यार असल्याचे लोकशाहीचे फाजिल लाड करणारे सांगत असतात, पण पाच वर्षे हालाखीचे काढून हत्यार उपसण्याची वेळ येते तेव्हाच आमचे चलाख मंत्री भ्रष्ट्राचाराचा पैसा जनतेमध्ये वाटून पुन्हा सत्ता बळकावतात. ज्यांनी प्रामाणिकपणे चिडून सरकारविरोधी मतदान केलेले असते ते केवळ कपाळाला हात लावल्यावाचून काहीच करु शकत नाहीत.
ट्युनेशिया, येमेन आणि इजिप्तसारखेच इथल्या जनतेने खरे तर आतापर्यंत पेटून उठायला हवे होते. पण तसे काही घडलेले नाही किंवा घडणार नाही अशी पक्की खात्री सरकारला आहे. गांधीजींच्या अहिंसेला कॉंग्रेसने कधीच मुठमाती दिलीय, पण जनतेने हमखास त्याच मार्गाने चालावे असे कॉंग्रेसवाल्यांना वाटते. हा देश अनेक क्रांतीकारकांच्या बलिदानाने स्वतंत्र झालाय हे जनतेला माहीत असावे. हे कॉंग्रेसचे सरकार गेल्याशिवाय सर्वसामान्यांना सुखाचे दिवस दिसणार नाहीत, हे सत्य आहे. नसेल पटत उदाहरण म्हणून देशातील कॉंग्रेसेतर राज्यांची प्रगती पहा!
Tuesday, 1 February 2011
webmajha.com : फेब्रुवारी महिन्याचे पहिले अपडेट
वेबमाझा.कॉमचा हा केवळ दुसरा महिना. पहिल्या महिन्यात एकूण सहा लेख अपडेट केले. इंटरनेटवरुन या सर्व लेखांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला हे उपलब्ध आकड्यांवरुन समजतेय. संपूर्ण जानेवारी महिन्यात ११२३७ वेळा वेबसाईटच्या पेजेसना भेट दिल्या गेल्या.
या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात दोन लेख नविन आहेत.
महाराष्ट्राला आत्मभान देणारा क्रांतिकारक विचारवंत प्रबोधनकार ठाकरे यांच्यावर काही महिन्यांपूर्वी वेबसाईट श्री. सचिन परब यांनी तयार केली. प्रबोधनकारांचे विचार ज्या पुस्तकांमध्ये साठविले गेले आहेत ते एकतर आज सहजच कुठेही उपलब्ध नाहीत किंवा आमच्या मराठी माणसाने त्यांच्याबद्दल जास्त वाचन केलेच नाही. प्रबोधनकार.कॉम कशी बनली यावर खुद्द सचिन परब यांनी लिहिलेला लेख आहे.
प्रबोधनकार डॉट कॉमची गोष्ट
http://www.webmajha.com/article.php?prabodhankar-dot-com
http://www.webmajha.com/article.php?prabodhankar-dot-com
इंटरनेटच्या युगात अनेक ऑनलाईन शॉपिंगच्या साईटस उपलब्ध आहेत. आपण सर्वजण हे बघत असतो, परंतु कधी या वेबसाईटवरुन खरेदी करतो का? जर करत असू तर आपल्याला एकूण या पध्दतीची माहिती असेल परंतु आजही अनेक इंटरनेट वापरणारे ऑनलाईन शॉपिंग करताना घाबरतात. रोजच्या वर्तमानपत्रात सायबर गुन्ह्यांच्या बातम्या वाचनात येतात, त्यामुळे साहजिकच आहे सर्वसामान्य माणूस या गोष्टींपासून दूर राहतो. परंतु सायबर गुन्हे हे आता इतके सोप्पे राहिलेले नाहीत की कुठल्याही साईटवरुन आपल्या खात्याची चोरी होऊ शकते. यावरच थोडक्यात माहिती देण्याचा मी प्रयत्न केलाय.
ऑनलाईन शॉपिंग करु या!
http://www.webmajha.com/article.php?online-shopping
http://www.webmajha.com/article.php?online-shopping
Sunday, 30 January 2011
World Cup Cricket Tickets ऑनलाईन खरेदी करा
वर्ल्ड कप क्रिकेट या फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे यावेळेस वर्ल्डकप आपल्या देशात होत आहे त्यामुळे क्रिकेट हा धर्म ज्या देशाचा आहे अशा देशात मैदाने तुडूंब भरणार याबद्दल शंकाच नाही.
आयसीसीने वर्ल्डकप सामन्यांची तिकीट विक्री ऑनलाईन सुरु केलेली आहे. क्याझुंगा.कॉम या वेबसाईटवरुन प्रक्टीस मॅचपासून ते वर्ल्डकप फायनलपर्यंतची तिकीटविक्री होणार आहे. मैदान तुडूंब भरणार म्हणजेच मैदानात जाऊन तिकीट विकत घेणे केवळ अशक्य आहे तेव्हा घरबसल्या तिकीट घेणे अतिशय सोप्पे आहे.
तिकीट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर भेट देऊ शकता:
batmya.com : ऑनलाईन मराठी बातम्या वाचा
रोज सकाळी अनेकजण ऑनलाईन आल्यानंतर बातम्या वाचण्यासाठी वेगवेगळ्या वृत्तपत्र किंवा न्युज चॅनेलच्या वेबसाईटसना भेट देत असतात. ठळक बातम्या वाचायच्या असतील तर प्रत्येक वेबसाईटवर जाणे अतिशय वेळकाढूपणा आणि तापदायक असते. सहजच इंटरनेटची सफर करत असताना ‘बातम्या.कॉम’ नावाची एक वेबसाईट पाहिली, सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स तसेच काही इंग्रजी सारख्या वृत्तपत्रांच्या ठळक बातम्या, मराठी व इंग्रजी वृत्तपत्र, न्युज चॅनेलच्या वेबसाईटसचे पत्ते सुद्धा या साईटवर दिलेले आहेत.
Saturday, 29 January 2011
BSNL आणि Reliance ला ग्राहकांचा नकार
MNP अर्थात मोबाईल नंबर पोर्टबिलीटी सेवा या महिन्याच्या २० तारखेला सुरु झाली आणि अवघ्या एका आठवडयात काही मोबाईल ऑपरेटर्सचे पितळ उघडे पडले. ग्राहकांना मनासारखी सेवा न देऊ शकणाऱ्या कंपन्यांवर आता ग्राहकराजाने MNP ची तलवार उपसली असून भविष्यात अजूनही याचे परिणाम मोबाईल कंपन्यांना भोगावे लागणार आहेत.
ही सेवा सुरु झाल्यानंतर बीएसएनएल आणि रिलायंन्स यांच्या ग्राहकांनी खुपच मोठ्या प्रमाणात आपले ऑपरेटर्स बदलत आहेत. बीएसएनएल च्या २० हजारापेक्षा अधिक तर रिलायन्स (CDMA आणि GSM)च्या तब्बल १३ हजारापेक्षा जास्त ग्राहकांनी या कंपन्यांना दिवसा तारे दाखविले आहेत. तर मोबाईल सेवेत सतत बदल करणाऱ्या वोडाफोन या कंपनीकडे MNP अंतर्गत २० हजार ग्राहकांची भर पडली आहे.
दोन दिवसांपूर्वी द हिंदु बिझनेस लाईन ने हे आकडे प्रकाशित केले आहेत. खालील चार्ट पहा :
Labels:
FB,
Mobile Operator,
Mobile Phone
‘व्हर्च्युअल क्लासरुम’ महानगरपालिकेचे प्रगतीचे पाऊल
या आठवड्यात शिवसेनेचे कार्यप्रमुख श्री. उध्दवसाहेब ठाकरे यांनी ‘व्हर्च्युअल क्लासरुम’ या मुंबई महानगरपालिकेच्या योजनेचे उद्घाटन केले. मुंबई महानगरपालिकेच्या २४ शाळांमध्ये ही सुविधा सध्या उपलब्ध करुन देण्यात आलेली असून येत्या काही दिवसात १०० शाळांचा समावेश यात करण्यात येणार आहे.
‘व्हर्च्युअल क्लासरुम’ ही संकल्पना श्री. उद्धवसाहेबांची असून महानगर पालिका शाळांचा चेहरामोहरा मागच्या काही दिवसातून बदलत असताना खाजगी शाळांप्रमाणेच महानगर पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करता आले पाहिजे तसेच तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शनाचा लाभ एकाच वेळेस अनेक विद्यार्थ्यांना झाले पाहिजे अशा मताच्या उध्दवसाहेबांची संकल्पना म्हणजेच महानगर पालिकेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी केलेला मोठा क्रांतिकारी बदल असेच म्हटले पाहिजे.
व्हर्च्युअल क्लासरुमच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या सर्व शाळांना जोडून सर्व विद्यार्थी एकाच वेळी तज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन घेऊ शकतील तसेच मनातील प्रश्न त्या शिक्षकांना विचारुन शंकांचे निरसनसुद्धा करुन घेऊ शकतील. व्हर्च्युअल क्लासरुम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन महानगर पालिकेतील विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे शिक्षण देणारी मुंबई महानगर पालिका ही देशातील पहिली महानगरपालिका ठरलेली आहे. प्रत्येक शाळेला एक एलसीडी टिव्ही, वेब कॅमेरा आणि माईक देण्यात आला असून व्हर्च्युअल क्लासरुमचा मुख्य स्टुडिओ अंधेरीत व्हॅल्युएबल ग्रुपच्या कार्यालयात आहे. तेथून तज्ञ शिक्षक २४ शाळांमधील विद्यार्थ्यांना एकाच वेळी मार्गदर्शन करतात.
महानगर पालिकेच्या शाळांच्या शिकवण्याच्या पध्दतीमध्ये श्री. उद्धवसाहेबांनी अमुलाग्र बदल मागच्या काही काळात केलेले आहेत आणि त्याचा चांगला फायदा गरीब विद्यार्थ्यांना होत आहे. शिवसेनेच्या विकासाच्या कामांची अशी दखल खासकरून मिडीया का घेत नाही हा मोठा प्रश्न आहे. उद्धवसाहेबांच्या राजकिय प्रतिक्रियांसाठी धावपळ करणाऱ्या मिडीयाला महानगरपालिकेच्या शाळांत सुरु होणाऱ्या या अद्ययावत बदल दिसू नयेत हीच आपल्या लोकशाहीची दुर्दशा आहे म्हटले तरी हरकत नाही.
Tuesday, 25 January 2011
मराठी टायपिंग प्रणाली सेंटींग कशी कराल?
हल्ली इंटरनेटवर मराठी भाषेचा वापर प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. सोशल नेटवर्किंगवर प्रामुख्याने याचा वापर जास्तीत जास्त केला जातो. मराठी टायपिंगसाठी अनेक साधने उपलब्ध आहेत त्यात गुगल ट्रान्स्लिट्रेशन, बरहा, क्विलपॅड इत्यादींचा वापर केला जातो.
विंडोज एक्सपी ऑपरेटींग सिस्टममध्ये मराठी (देवनागरी) भाषेत टाईप करण्यासाठी इंडीक नावाची प्रणाली दिलेली आहे, ज्याद्वारे आपण कुठल्याही इतर साधनांचा वापर न करता थेट आपल्या संगणकावर हवे तिथे आपल्या भाषेत टाईप करु शकतो.
खालील विडीयो पहा, यात मराठी भाषेतून आपल्या संगणकावर लिहिता येण्यासाठी सेटींग कशी करावी याबद्दलची अतिशय महत्वाची माहिती दिलेली आहे.
Monday, 24 January 2011
हिंदुस्थानात तिरंगा फडकविणे म्हणजे गुन्हा?
भाजपच्या युवक मोर्च्याने २६ जानेवारी हिंदुस्थानच्या प्रजासत्ताक दिनी काश्मिरमधील लाल चौकामध्ये तिरंगा फडकविण्याचे ठरविले आणि तशी तिरंगा यात्रा देशाच्या वेगवेगळ्या प्रांतातून सुरु झाल्या. परवा २६ जानेवारी आहे, तिरंगा यात्रा आज पंजाबमधून काश्मिरच्या दिशेने निघत आहे. परंतु काश्मिरमधील सत्तेत असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सच्या मुख्यमंत्र्यांना भिती वाटतेय की यामुळे काश्मिरचे सामाजिक स्वास्थ बिघडेल, काश्मिरमध्ये अशांतता पसरेल..
भाजपसुद्धा काश्मिरमध्ये तिरंगा फडकवून लोकांपर्यंत पोहचण्याचे राजकारण करतेय हे सत्य आहे. परंतु चुकीचे असे नक्कीच काही करत नाही. ज्या राज्यघटनेचा वारंवार उल्लेख केला जातो त्याच घटनेच्या प्रजासत्ताक दिनी तिरंगा फडकविणे हे कॉंग्रेसच्या दृष्टीने पाप म्हटले जातेय, हे राज्यघटनेचेच दुर्दैव म्हणायला हवे. भाजपवाले तिरंगा आपल्याच देशाच्या जमिनीवर फडकवत असल्याने त्यात विशेष असे काहीच म्हणता येणार नव्हते, पण तो तिरंगा भाजपवाले फडवत आहेत म्हणून कॉंग्रेसच्या पोटात दुखायला लागले आणि त्यांनी यामध्ये राजकारण आणले.
कॉंग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सवाल्यांचे म्हणणे आहे की, काश्मिरमधील फुटीरतावाद्यांमुळे अगोदरच तिथे अशांतता असताना तिरंगा फडकविल्याने आणखी परिस्थिती खराब होईल म्हणजेच हे दोन्ही पक्ष स्वत:च सांगत आहेत की यांना सरकार चालविणे कठीण जातेय. फुटीरतावादी शक्ती या देशात पसरविली कोणी? तर कॉंग्रेसवाल्यांनीच! तब्बल ६० वर्षाच्या सत्तेत कॉंग्रेसने या देशासाठी काहीच केले नाही हे सत्य आहे, परंतु जर काही केले असेल तर देश-विघातक कारवाया करणाऱ्यांचे बळ वाढविणे. याबाबतीत पुढे कॉंग्रेसवाल्यांचे म्हणणे आहे की, काश्मिरमधील सामाजिक स्वास्थ्य बिघडेल म्हणजेच कॉंग्रेसवाले सर्वसामान्यांची किती काळजी घेत आहेत बघा!
काश्मिरमध्ये तिरंगा फडकविल्याने हिंदुस्थान देशातील एका प्रांताचे सामाजिक स्वास्थ्य कसे बिघडू शकते? असे म्हणणाऱ्यांना उघडे करुन चाबकाचे फटके दिले पाहिजेत. जर तिरंगा फडकविल्याने सामाजिक स्वास्थ्य बिघडू शकते तर अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्याने देशाचे सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे त्याची जबाबदारी कॉंग्रेस घ्यायला तयार आहे? अफजल गुरुने देशाच्या संसदेवर हल्ला करुन देशाचे नाक कापून देशाचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवले त्याला सुप्रिम कोर्टाने ऑक्टोबर २००६ ला फाशीची सजा दिलीय पण कॉंग्रेसवाल्यांनी त्याला सोनियाचा जावई बनवून ठेवला घेतला आहे. २६/११ ला मुंबईमध्ये ७२ तास धुमाकूळ घालणाऱ्या कसाबच्या टोळीने आणखी एकदा देशाची मान शरमेने झुकवली, पंतप्रधान मुंबईकरांचे कौतुक करतात पण कसाब कसा सुरक्षित राहिल याची काळजी कॉंग्रेसवाले आणि सोबत राष्ट्रवादीचे आबा पाटील आणि भाजपाचे एकनाथ खडसे करत आहेत. मुंबईमधील वाढत्या लोंढ्यांनी मुंबईचे स्वास्थ्य रोजच बिघडत आहे. मुंबईची अवस्था परप्रांतियांनी खराब केली आहे. करदात्या मुंबईकरांना सुविधा पुरविताना महानगरपालिकेच्या नाकी नऊ येत असताना इथेही कॉंग्रेसवाले काही ठोस निर्णय घेत नाहीत, आणि तिरंगा फडकविल्याने सामाजिक स्वास्थ बिघडेल म्हणून इतकी काळजी?
या सर्व गोष्टींना कोण जबाबदार असेल तर जनता. झोपी गेलेली जनता कधी जागी होणार आहे की नाही ते माहित नाही. देशप्रेमींना या देशात देशद्रोही ठरविण्याचे काम कॉंग्रेस मागची अनेक वर्षे करीत आहे. सावरकर्, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्यांचा कधीही सन्मान केला गेला नाही. तरीही ही झोपी गेलेली जनता आजही कॉंग्रेसच्या चिपळ्या वाजवतेय हेही या देशाचेच दुर्दैव!
पंडीत भिमसेन जोशी यांना आदरांजली
भारतरत्न स्वरभास्कर पंडीत भिमसेन जोशी यांचे आज पुण्याच्या सह्याद्री रुग्णालयात दिर्घ आजाराने निधन झाले. पंडीतजींचा जन्म ४ फेब्रुवारी १९२२ साली गदग, धारवाडमध्ये झाला होता.
पंडीतजींना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.
पंडीतजींना भावपूर्ण आदरांजली!
Sunday, 23 January 2011
महाराष्ट्राला बाळासाहेबांचेच नेतृत्व हवेय!
महाराष्ट्रात अनेक महान नेते होऊन गेले, ज्यांनी देशासाठी आपले आयुष्य पणाला लावले. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यासारखे नेते हे तमाम जनतेच्या गळ्यातील ताईत बनून राहिले. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला शूर-वीरांची भूमी म्हणून प्रसिद्ध केले, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्याच शिवरायांचे भक्त बनून अखंड हिंदुस्थानचा पुरस्कार करताना इंग्रजी राजवटीला हलवून सोडले, त्याच शिवबाच्या मातीत त्याच शिवबाचा भक्त बनून आज जर कोणी महाराष्ट्राला किंबहुना मराठी माणसाला मान-सन्मानाने जगायला शिकवले असेल तर ते हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनीच!
व्यंगचित्रकार एवढा मोठा नेता बनू शकतो हे कदाचित जगातील एकमेव उदाहरण असेल. इतर नेत्यांवर व्यंगात्मक कला चितारुन त्याच क्षेत्रात काम करणे हे फारच कठीण आहे. पंडीत जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई यांच्यासारखे नेते भरात असताना त्यांच्यावर व्यंगचित्र काढणे हे सोप्पे नव्हते, पण शिवरायांच्या भूमीत जन्माला आलेला मराठी माणूसच हे करु शकतो हे बाळासाहेबांनी दाखवून दिले. ‘मार्मिक’ या व्यगंचित्र साप्ताहिकाच्या माध्यमातून ‘शिवसेना’ नावाची मर्दांची संघटना बाळासाहेबांनी प्रबोधनकारांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केली. शिवसेनेचे वय आज ४५ वर्षे जरी असले आणि स्थापनेपासून काम करणारे शिवसैनिक हे कायम तरुणच असतात, याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे.
४५ वर्षांपैकी जवळ जवळ ४० वर्षे सत्ता नसतानाही आक्रमक संघटना कशी टिकू शकते हे अनेकांना पडलेले कोडे आहे. तात्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनीही शिवसेना संपविण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले असे आजही वाचनात येते, एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या प्रयत्नांनी शिवसेना संपू शकली नाही याचा अर्थ यात कुठेतरी दैवी शक्ती असलीच पाहिजे असे मानले तरी हरकत नाही. आजही काहीजण शिवसेना संपविण्याची कोल्हेकुही करत असतात पण या चिटपाखरांना ४२ पिढ्याही शक्य होणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे.
बाळासाहेबांनी शिवसेनेत नुसती माणसांची भरती केली नाही तर निष्ठावान मावळ्यांची फौज स्वत:च्या जादुई नेतृत्वाने उभी केली. बाळासाहेब वयाने थकले असले तरी त्यांची जादु आम्हा तरुणांवर कायम आहे. अनेकजणांना साहेबांची भाषण ऐकता आली नाहीत परंतु जे काही वाचून कळते त्यावरुन साहेबांचे मोल आम्हा तरुणांसाठी फार मोठे आहे. ‘जिथे पिकते, तिथे विकले जात नाही’ ही म्हण मराठी माणसासाठी चपखल लागू पडते. शिवाजी महाराजांच्या जयंतीपासून ते दादोजी कोंडदेवांपर्यंत आपण इतिहास जगण्यापेक्षा त्यावर वादच करत बसलो. बाळासाहेबांसारखे आधुनिक आणि प्रगतीशिल नेतृत्व असतानाही आमच्या महाराष्ट्राने संधी दिली ती केवळ साडेचार वर्षासाठीच! त्याही साडेचार वर्ष मिळालेल्या संधीचे सोने करुन साहेबांनी अनेक विकासकामे करुन दाखविली. शिवशाही सरकारच्या कामांमध्ये प्रामुख्याने मुंबईतील ५५ उड्डाणपुल, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे-वरळी सागरीसेतू ही कामे आहेतच, तसेच सर्वसामान्यापर्यंत सरकार पोहचले पाहिजे यासाठी अनेक सरकारी उपक्रम कोकणासारख्या मागासलेल्या भागात आणले. आजच्या तरुणाला प्रगती आणि विकास या दोन गोष्टी महत्वाच्या वाटतात, बाळासाहेबांनी मुळात त्या शिवसेनेत यापूर्वीच राबविलेल्या आहेत. मुंबईमध्ये मागची अनेक वर्षे महानगरपालिकेत सत्तेत राहून शिवसेनेने मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर असल्याने सिद्ध करुन दाखविले आहे. महानगरपालिकेकडे असलेले मर्यादित अधिकार बघता देशातील इतर महानगरपालिकांमध्ये मुंबई कैक पट पुढे आहे.
बाळासाहेब हे तरुणांचे आदर्श नेते आहेत आणि कायमस्वरुपी राहणार आहेत. स्पष्ट बोलणारा माणूस राजकारणात स्वकर्तुत्वावर टिकू शकतो हे साहेबांनी दाखवून दिलेय पण त्यामुळे अनेकांची गोचीही झालेली आहे. बाळासाहेबांचेच जुने मित्र शरद पवार हे एकेकाळी साहेबांच्या स्पष्टवक्तेपणामुळे साहेबांपासून लांब गेले होते. अनेकजण साहेबांच्या याच स्वभावामुळे जवळ यायला तयार होत नाहीत. साहेबांनी शिवसैनिकांवर जेवढे प्रेम केले तेवढे कुणावरच केले नसेल. जगातील कुठल्याही पक्षातील कार्यकर्त्याला समाजात मान नसेल इतके मान शिवसैनिक म्हणून मिळते हा आम्हा शिवसैनिकांचा अनुभव आहे. पैसा-संपत्ती या मोहात न पडता केवळ मराठी अस्मितेचे जतन झाले पाहिजे यासाठी अनेक मोठ्या लोकांशी साहेबांनी पंगा घेतला. परंतु स्वत:च्या विचारांशी आजही कायम प्रामाणिक राहिले आहेत.
बाळासाहेबांसारखे नेतृत्व हे अनेक वर्षांनी जन्माला येते. बाळासाहेबांच्या भाषणाची नक्कल करुन, वेगळे दुकान मांडून, मराठी माणसाच्या विश्वासाचा वापर स्वत:चे पोट भरण्यासाठी केलेले काही स्वयंभू नेते साहेबांच्या कुटूंबातच जन्माला आले हे सर्वांचे दुर्भाग्य आहे. परंतु बाळासाहेबांनी दिलेला विचार आचरणात आणण्याचे काम केवळ शिवसैनिकालाच जमते. घरदार सोडून शिवसेनेसाठी झोकून देणारे शिवसैनिक साहेबांना मिळाले एवढे भाग्य लाभलेला नेता क्वचित असेल.
आज बाळासाहेबांचा वाढदिवस, साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर अनेकजण लिखाण करत असतात, वर्तमानपत्रांमध्ये पुरवण्या निघतात. माझाही तसाच मोडक्या-तोडक्या भाषेतील हा लेख माझ्या ब्लॉगवर लिहित आहे. आमच्या साहेबांना अखंड निरोगी आयुष्य लाभो, ही आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो आणि साहेबांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा देतो.
जय हिंद! जय महाराष्ट्र!!
Labels:
FB,
Maharashtra,
Mumbai,
Shiv Sena
Thursday, 20 January 2011
Mobile Number Portability अर्थात ग्राहकराजाचा हक्क
आजपासून मोबाईल वापरणारासुद्धा मोबाईल कंपनीसाठी ग्राहकराजा म्हणूनच ओळखला जाणार आहे. मोबाईल सुविधा सुरु झाल्यापासून मोबाईल ऑपरेटर्सच्या सर्व असुविधा निमुटपणे सहन करणाऱ्या मोबाईलधारकाकडे खुद्द ट्राय ने आता हत्यार दिलेले आहे.
रिलायन्सने हिंदुस्थानात ‘मोबाईल क्रांती’ करुन स्वस्त फोन विकण्याची स्किम काढली आणि प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन दिसायला सुरुवात झाली. अन्न, वस्त्र, निवारा सोबत मोबाईल ही आणखी एक मुलभूत गरज भासू लागली. अर्थातच याचा सर्वात जास्त फायदा मोबाईल कंपन्यांनी पाहिजे तसा घेतला. कधी किंमत युद्ध तर कधी स्वस्त फोन अशा स्किम येतच राहिल्या पण जे ग्राहक फोन वापरत आहेत त्यांच्या हिताकडे या कंपन्यांनी नेहमीच दुर्लक्ष केले. याच गोष्टीकडे पाहून ट्रायने ‘Mobile Number Portability’ अर्थात नंबर कायम ठेवून मोबाईल कंपनी बदलण्याचे विकल्प ग्राहकांसमोर ठेवले आहे.
ही सेवा आज पासून सुरु होत असून ती वापरण्यासाठी साधे-सोप्पे प्रक्रिया आहे. ती अशी:
१. आपल्या मोबाईलच्या टेक्स्ट मेसेज मध्ये जाऊन PORT <mobile Number> असा SMS 1900 या क्रमांकावर पाठवा.
उदा. PORT 9821098210
२. Reply म्हणून एक ८ अंकी `Unique Porting Code’ मिळेल.
३. हा कोड मर्यादित कालावधीकरिता वापरता येतो म्हणुन युनिक पोर्टींग कोड मिळाल्यानंतर ज्या कंपनीची आपल्याला सुविधा हवीय त्यांच्याकडे आपले पुराव्याचे कागदपत्र (Address Proof, Photo ID आणि Photograph) घेऊन जायचेय.
४. तुमच्यासाठी सेवा उपलब्ध झाल्याचे SMS ने कळविले जाईल.
५. ४ दिवसाच्या आत तुम्हाला १९ रुपये आणि सीमकार्डची किंमत देऊन नविन कंपनीचा सीम कार्ड घ्यायचाय.
६. नविन कंपनीसोबत किमान ९० दिवस राहणे बंधनकारक असेल. ९० दिवसानंतर पुन्हा याच पद्धतीने आपण कंपनी बदलू शकता.
अधिक माहिती
१. तुम्ही सध्या वापरत असलेल्या CDMA (TATA, Reliance, Virgin, MTS, Garuda) यामधून कुठल्याही GSM नेटवर्कमध्ये जाऊ शकता.
२. पोस्टपेड मधून प्रिपेड मध्ये जाऊ शकता.
३. ही सेवा फक्त मोबाईल फोन्स साठीच आहे. लॅण्डलाईनसाठी वापरु शकत नाही.
४. ही सेवा फक्त जिथे राहतो त्याच सर्कल मध्ये म्हणजेच समजा आपण मुंबईत आहात तर मुंबई सर्कल मध्येच वापरु शकता. महाराष्ट्र हे वेगळ्या सर्कल मध्ये येत असल्याने तिथे ही सेवा मिळणार नाही.
५. नंबर बदलण्यासाठी मोबाईल कंपन्यांना ट्राय ने केवळ ७ दिवसाचा अवधी दिला असल्याने ही सेवा आपल्याला एका आठवड्यातच मिळणार आहे.
६. ही सेवा यशस्वीपणे हरियाणामध्ये राबविली गेली आहे.
आपल्याला याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास आयडिया मोबाईल कंपनीच्या टॉल फ्री नंबर 1800-270-0000 इथे संपर्क साधू शकता.
Labels:
FB,
Mobile Operator,
Mobile Phone
Subscribe to:
Posts (Atom)