Showing posts with label Internet. Show all posts
Showing posts with label Internet. Show all posts

Friday, 4 March 2011

सोशल नेटवर्किंग साइटसाठी तुमचे युजरनेम उपलब्ध आहे का?

ब-याचदा अनेक ऑनलाइन खात्यांसाठी आपण एकच य़ुजरनेम वापरतो. काही ठिकाणी आपले युजरनेम उपलब्ध नसेल तर फुकट वेळेची बरबादी होते. तेव्हा आपल्याला हवे असलेले युजरनेम कुठल्या सोशल नेटवर्किंग साइटवर उपलब्ध आहे आपण नेमचेक.कॉम चा वापर करून शोधू शकतो. तर मग बघा तुमचे आवडीचे युजरनेम आणखी कुठे उपलब्ध आहे आणि असेल तर लगेच खाते बनवून घ्या.

Wednesday, 2 March 2011

वेबमाझा.कॉम - मार्च महिन्याचे अपडेट

मागचे अनेक दिवस ब्लॉग अपडेट केलेला नाही. इतर कामात व्यस्त असल्यामुळे म्हणणार नाही, कारण कामातून वेळ काढून अशा गोष्टी केल्या पाहिजेत असे मनापासून वाटते. असो उगाच यात वेळ नाही घेत.

वेबमाझा यावेळची अपडेट तशी एक दिवस उशीरा करतोय. वेबसाईटचे फायनल डिजाइन पूर्ण व्हायला वेळ गेल्याने हा वेळ झाला. यावेळेस वेबमाझावर मराठीतील एका प्रगत तंत्रज्ञानाने भरपूर अशा मानबिंदू.कॉम बद्दल मी स्वत: लिहीले आहे. काही ठिकाणी योगेशने माहिती दिलीय त्यासाठी योगेशचे आभार मानतो. आम्ही शिल्पकार उद्याचे हे मानबिंदूचे ब्रिदवाक्य आहे. त्यानुसार मराठी कलाकारांसाठी ही वेबसाईट काम करतेय. वेबसाईटवरील माहिती ही अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत मांडलेली आहे. त्यामुळे वाचकांनाही ही वेबसाईट खुप आवडतेय.

वेबमाझावर यावेळेस मानबिंदू यासाठीच कारण योगेशची मेहनत जवळून पाहिलेल्यांपैकी मी एक आहे. खुप चांगल्या पगाराची, चांगल्या हुद्दयाची नोकरी सोडून आज योगेश फुलटाईम या वेबसाईटला देत आहे. मला योगेशबद्दल मुळीच सांगायचे नाही पण त्याच्या मेहनतीचा उल्लेख लेखामध्ये न करण्याचे त्यानेच सांगितले होते म्हणून ब्लॉगवर चान्स मारला.

असो, मानबिंदूचे यावेळेचे विशेष हेच की, आता आपण मानबिंदूवरून पैसे सुध्दा कमावू शकतो. तुमची वेबसाईट, ब्लॉग किंवा तुमच्या फेसबुक खात्यावरुनही हे शक्य आहे. मानबिंदूवरील उत्पन्न मिळवा मध्ये याची सविस्तर माहिती आहे. आपण जरूर या आपल्या मराठी साईटवरील अनोख्या संधीचा फायदा घ्या.

आम्ही शिल्पकार उद्याचे या लेखाची लिंक खाली देत आहे

Monday, 14 February 2011

झटपट फाईल शेअर करा

ईमेलमधून साधारणपणे १० एम.बी.ची फाईल आरामात पाठवता येते. पण जेव्हा त्यापेक्षा मोठी फाईल पाठवायची असते तेव्हा शोधाशोध सुरू होते. फाईल शेअरींग किंवा फाईल स्टोरेजसाठी अनेक वेबसाईटस आहेत.

Ge.tt  ही इन्स्टंट फाइल पब्लिशींग आणि शेअरींग सेवा आहे. इथून आपण कितीही मोठी फाइल अपलोड करतानाच समोरील व्यक्तीसोबत शेअर करू शकतो. फाइल अपलोड होतानाच समोरील व्यक्ती तिच फाइल डाऊनलोड करायला सुरू करु शकते.

मग पहा हि सेवा वापरून! आणि कृपया आपला अनुभव इथे शेअर करायला विसरु नका!

Sunday, 30 January 2011

World Cup Cricket Tickets ऑनलाईन खरेदी करा

वर्ल्ड कप क्रिकेट या फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे यावेळेस वर्ल्डकप आपल्या देशात होत आहे त्यामुळे क्रिकेट हा धर्म ज्या देशाचा आहे अशा देशात मैदाने तुडूंब भरणार याबद्दल शंकाच नाही.

आयसीसीने वर्ल्डकप सामन्यांची तिकीट विक्री ऑनलाईन सुरु केलेली आहे. क्याझुंगा.कॉम या वेबसाईटवरुन प्रक्टीस मॅचपासून ते वर्ल्डकप फायनलपर्यंतची तिकीटविक्री होणार आहे. मैदान तुडूंब भरणार म्हणजेच मैदानात जाऊन तिकीट विकत घेणे केवळ अशक्य आहे तेव्हा घरबसल्या तिकीट घेणे अतिशय सोप्पे आहे.

तिकीट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर भेट देऊ शकता:

batmya.com : ऑनलाईन मराठी बातम्या वाचा


रोज सकाळी अनेकजण ऑनलाईन आल्यानंतर बातम्या वाचण्यासाठी वेगवेगळ्या वृत्तपत्र किंवा न्युज चॅनेलच्या वेबसाईटसना भेट देत असतात. ठळक बातम्या वाचायच्या असतील तर प्रत्येक वेबसाईटवर जाणे अतिशय वेळकाढूपणा आणि तापदायक असते. सहजच इंटरनेटची सफर करत असताना ‘बातम्या.कॉम’ नावाची एक वेबसाईट पाहिली, सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स तसेच काही इंग्रजी सारख्या वृत्तपत्रांच्या ठळक बातम्या, मराठी व इंग्रजी वृत्तपत्र, न्युज चॅनेलच्या वेबसाईटसचे पत्ते सुद्धा या साईटवर दिलेले आहेत.

एकदा बघून तर घ्या : बातम्या.कॉम




Tuesday, 25 January 2011

मराठी टायपिंग प्रणाली सेंटींग कशी कराल?

हल्ली इंटरनेटवर मराठी भाषेचा वापर प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. सोशल नेटवर्किंगवर प्रामुख्याने याचा वापर जास्तीत जास्त केला जातो. मराठी टायपिंगसाठी अनेक साधने उपलब्ध आहेत त्यात गुगल ट्रान्स्लिट्रेशन, बरहा, क्विलपॅड इत्यादींचा वापर केला जातो.

विंडोज एक्सपी ऑपरेटींग सिस्टममध्ये मराठी (देवनागरी) भाषेत टाईप करण्यासाठी इंडीक नावाची प्रणाली दिलेली आहे, ज्याद्वारे आपण कुठल्याही इतर साधनांचा वापर न करता थेट आपल्या संगणकावर हवे तिथे आपल्या भाषेत टाईप करु शकतो.

खालील विडीयो पहा, यात मराठी भाषेतून आपल्या संगणकावर लिहिता येण्यासाठी सेटींग कशी करावी याबद्दलची अतिशय महत्वाची माहिती दिलेली आहे.






Monday, 17 January 2011

वेबमाझा.कॉम : वेबसाईट अपडेट

१ जानेवारी २०११ पासून ‘वेबमाझा.कॉम’ ही वेबसाईट नविन स्वरुपात सुरु केली. प्रतिभावान मराठी तरुण, यशस्वी मराठी माणूस, संस्था किंवा संघटना यांचा इंटरनेटवरुन व्यासपीठ उपलब्ध करुन देणे हे माझे सर्वात पहिले उद्दिष्ट आहे. हाच उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून मागच्या अंकात एका गरीब कुटूंबातून येऊन आज सहकार क्षेत्रात खुपच चांगला जम बसविले आहे अशा आनंद माईंगडे यांच्यावरील लेख अनेकांना आवडला. आपल्या सर्वांच्या अशाच चांगल्या प्रतिसादानेच मला हे सगळे लिहिण्यासाठी हुरुप मिळणार आहे म्हणुन वेबमाझावरील लेखांवरील आपल्या सूचना किंवा प्रतिक्रिया द्यायला बिलकुल विसरु नका.

आताच्या नविन अंकात पुन्हा तीन नविन लेखांचा समावेश आहे. त्यातील एक नेहमीप्रमाणे मुख्य उद्दीष्टाला धरुन आहे. ‘भाडेकरु संघ महामंडळ’ ही संघटना खुप चांगले काम करत असून त्यांच्याबद्दलची माहिती अनेकांना नसल्यामुळे मला त्यांच्याबद्दलचा हा लेख लिहावास वाटला, अनेक जण आपल्या आयुष्यातील महत्वाचा वेळ कुठल्यातरी ध्येय्यासाठी देत असतात, त्यातच सामाजासाठी काही करण्याचे ज्यांचे ध्येय्य असते अशांना त्यातुन किती पैसे मिळतात याच्याशी देणेघेणे नसते त्यांच्या डोळ्यासमोर असते ते फक्त ध्येय्य!

खाली लेखांच्या लिंक्स दिलेल्या आहेत, अपेक्षा करतो आपण आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया नक्की द्याल!

भाडेकरु संघ महामंडळ : 
http://www.webmajha.com/article.php?tenants-association

विकिपीडिया मराठी ज्ञानकोष : 
http://www.webmajha.com/article.php?marathi-wikipedia

सायबर पोलिसांची नजर तुमच्यावर आहे : 
http://www.webmajha.com/article.php?cyber-cell

Wednesday, 12 January 2011

डब्बेवाल्यांच्या नावाने पैसा खाणारा भुरटा चोर


माहिती तंत्रज्ञानाची भुरळ आज सर्वांनाच आहे. सोशल नेटवर्किंगमुळे जग खुपच छोटे झालेले आहे. माहितीचा खजिना एका क्लिकसरशी सर्वांसमोर खुला होत आहे. यातूनच काहींनी आपला धंदासुद्धा थाटला आहे. त्याद्वारे अमाप पैसा गोळा करण्याच्या मशिन तयार झाल्या आहेत. असेच काहीसे प्रकरण घडलेय ते मुंबईच्या प्रामाणिक डब्बेवाल्यांबरोबर!

डब्बेवाल्यांची किर्ती जगभरात पोहचत होती. जगातील सर्वात कुशल मॅनेजमेंट गुरु म्हणून डब्बेवाल्यांना प्रसिद्धी मिळत होती. याचाच फायदा घेऊन एक इंजिनीयर मनिष त्रिपाठी याने डब्बेवाल्यांसमोर वेबसाईटच्या माध्यमातून आपण करत असलेले काम जगभरात वेबसाईटच्या माध्यमातून पोहचवण्याची संकल्पना मांडली व मार्च २००६ मध्ये  www.mydabbawala.com नावाची वेबसाईट बनविली. जगभरातील दोन कोटी लोकांनी या वेबसाईटला भेट दिलेली असून डब्बेवाल्यांना मदत व्हावी या हेतूने लाखो रुपयांची देणगीसुद्धा दिलेली आहे.

दरम्यान मनिष त्रिपाठी डब्बेवाल्यांवर जगभरात डब्बेवाला या विषयावर व्याख्यान देत असे. डब्बेवाल्यांच्या हितासाठी काम करत असल्याचे तो सांगत होता. स्वत: डब्बे हातात घेऊन फोटो काढून विझिटींग कार्ड सुद्धा छापले होते. स्वत:च डब्बेवाला बनून जगभरात फिरुन जमा झालेली निधी स्वत:च्याच खिशात टाकण्याचे काम हा करीत असे. डब्बेवाल्यांच्या संघटनेने मनिष त्रिपाठीवर रितसर सायबर क्राईम पोलिसांमध्ये तक्रार केली असून पोलिसांनी या मनिष त्रिपाठी नावाच्या भुरट्या चोराला अटक केलेली आहे.

Tuesday, 11 January 2011

१५ मार्चला फेसबुक बंद होणार?


काल रात्री विकली वर्ल्ड न्युजच्या वेबसाईटवर एक बातमी वाचून खरच धक्का बसला. १५ मार्चला फेसबुक बंद होणार अशा प्रकारची ही बातमी होती. फेसबुकवर लाखो लोक रोज भेट देत असतात, आपल्या मित्र-मैत्रींणींशी बोलत असतात, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतात.
या वेबसाईटवरील बातमीत म्हटले आहे की फेसबुकचा मालक मार्क झुकरबर्ग याच्याशी फोनवरुन झालेल्या बोलण्यात फेसबुक वेबसाईट चालवताना खुप त्रास होतोय, फेसबुक एका चांगल्या कारणासाठी सुरु केले होते पण आता फेसबुकमुळे घडणारी गुन्हेगारी खुपच अस्वस्थ करतेय. आयुष्यपूर्वीप्रमाणे जगता येत नाही त्यामुळे हे सगळे बंद करुन जीवनातील मजा लुटायची आहे. वैगेरे.. 

आता इथे प्रश्न उरतो तो म्हणजे ही बातमी खरी आहे की खोटी? खरचं वरील गोष्टी मार्कने बोलून दाखविल्या असतील? करोडो लोकांचे फेसबुकवरील अकांऊंट एका झटक्यात कोणी बंद करेल का? मार्क झुकरबर्गला फेसबुकमुळे होणारे उत्पन्न त्याला नको झालेय का? गुगलसारखी खुप मोठी कंपनी असताना थेट वेबसाईट बंद करण्याचा निर्णय कोणी घेऊ शकेल का? असे अनेक प्रश्न आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हल्लीच मार्क झुकरबर्गने नेक्स्ट जनरेशन ईमेल सुविधा फेसबुक सुरु करणार असल्याचे जाहिर केलेय, आणि इतका मोठा निर्णय एका फोन कॉलवरुन होऊ शकेल?

मला तरी वाटते असे काहीही होणार नाही, काही खोडसाळ लोकांनी प्रसिद्धीच्या मोहापायी पसरविलेली ही अफवा असेल. जगातील सर्वात जास्त लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट बंद होऊच शकत नाही. पैसा कुणाला नकोय? असो ही सर्व वायफळ चर्चा जोपर्यंत स्वत: मार्क झुकरबर्ग किंवा फेसबुकमधील कोणी वरिष्ठ सांगत नाही तोपर्यंत सुरुच राहणार.

Sunday, 9 January 2011

गुगलवरुन गाणी ऐका

आपल्या आवडीचे एखादे गाणे ऐकायचे असेल आणि ते आपल्या पीसीमध्ये नसेल तर आपण काय करतो? साहजिकच ऑनलाईन एखाद्या वेबसाईटवर जाऊन एकतर डाऊनलोड करुन घेतो किंवा ऑनलाईन गाणे ऐकतो. मराठी-हिंदी अशा भाषांमधील हजारो गाणी इंटरनेटवर ऐकण्यासाठी उपलब्ध आहेत.

नेमके एखाद्या पिक्चरचेच गाणे ऐकायचे असेल तर आता गुगल म्युझीकने तशी सोय केलेली आहे. आपल्याला फक्त पिक्चरचे नाव गुगल म्युझीकमध्ये सर्च करायचेय काही क्षणात आपल्यासमोर त्या पिक्चरमधील सगळी गाणी स्क्रिनवर दिसतील जे गाणे ऐकायचेय त्यावर क्लिक केले की झाले गाणे सुरु!

गुगलने अनेक कठीण गोष्टी अगदी सहज उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. अर्थातच ही म्युझीक सेवा काही गुगलसाठी मोठी सुविधा देण्यासारखे नाही. पण एखादी वेबसाईट ओपन करुन सर्फ करण्यापेक्षा आपली बॅण्डविथ वाचवण्यासाठी गुगलची ही सेवा वापरायला जास्त सहज आणि सोप्पी आहे.

Friday, 7 January 2011

विकीपिडीयन मेळावा


१५ जानेवारी विकीपिडीय़ा दहावा वर्धापन दिन साजरा करत आहे. १५ जानेवारी हा दिवस विकीपिडीया दिन म्हणून ओळखला जातो. हेच निमित्त साधून मुंबईतील विकीपिडीयनसाठी मिटींग आयोजित करण्यात आलेली आहे. 

वेळ : शनिवार दिनांक १५ जानेवारी २०११, सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत.
स्थळ : व्हीजेटीआय, माटुंगा, मुंबई – ४०० ०१९.

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून यासाठी कुठल्याही प्रकारची फीस आकारली जाणार नाही. आपल्यातून जे या कार्यक्रमाला येण्यासाठी इच्छुक आहेत अशांनी खालील लिंकवर आपल्या नावाची नोंद करावी.

Wednesday, 5 January 2011

फेसबुक वापरा पण त्याच्या आहारी जाऊ नका


फेसबुकचा ५० कोटीपेक्षा जास्त लोक वापर करतात. त्यातले ५०% म्हणजेच जवळपास २५ कोटी लोक रोज न विसरता फेसबुकला भेट देतात. फेसबुक ही जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग वेबसाईट मानली जाते. आजची तरुणाई तर हल्ली सतत ऑर्कुट/फेसबुक/ट्विटर सारख्या माध्यमांवर्च रमलेली असते. सकाळ-संध्याकाळ ते अगदी झोप येईपर्यंत फेसबुकवर आपले स्टेट्स, कमेंट्स देण्यात गुंग झालेले असतात.

सोशल नेटवर्किंग ही आता इंटरनेटवरील खुप मोठी शक्ती म्हणून पुढे येत आहे. कॉर्पोरेट्सपासून ते छोट्या कंपन्यांपर्यंत सर्वजण सोशल नेटवर्किंग साईटसचा वापर आपला बिजनेस वाढवण्याकरिता करत आहेत. यामागची कारणे वरील आकडे आहेत. आपण ज्यांच्यासाठी प्रोडक्ट बनवतोय ते जर सोशल नेटवर्किंगसारख्या माध्यमांवर भेटणार असतील तर यापेक्षा मार्केटींगची मोठी संधीच असू शकत नाही हे समजायला या कंपन्यांना वेळ गेला नाही.

परंतु आपण आपला जो वेळ फेसबुकवर घालवतोय तो आपल्या आयुष्यातील अतिशय महत्वाचा आहे हे आपल्या ध्यानात आहे का? सकाळी उठल्यापासून ते रात्री ’गुड नाईट’ म्हणेपर्यंत आपले आयुष्य जर का फेसबुकवर जाणार असेल तर ते आपल्या आयुष्यासाठी घातक आहे. आपल्याला रोज अनेक कामे करायची असतात. शाळा, कॉलेज, नोकरी, गृहीणींना घरातील कामे, व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय. अशा कामांकडे दुर्लक्ष करुन आपण सतत फेसबुकचा विचार तर करत नाही ना? आपल्या कम्प्युटरपासून दूर असताना आपण सतत आपल्या स्टेटस किंवा कमेंटसचा विचार करत नाही ना? मोबाईलवरुन फेसबुक ऍक्सेस करण्याची आपल्याला सवय तर जडलेली नाही ना? जर असे काही होत असेल तर आपण फेसबुकच्या आहारी गेला आहात म्हणजेच आपल्याला ते व्यसन लागले आहे असे म्हणता येईल.

आपण जर फेसबुकच्या आहारी गेला असाल तर एखादे व्यसन सोडणे जितके कठीण असते तितकेच हेही व्यसन सोडणे कठीण आहे. पण ते सुटू शकत नाही असे मात्र नक्कीच नाही.
फेसबुकशी काहींचा संबंध व्यवसाय म्हणून येत असतो. पण तेही करताना त्यासाठी ठराविक वेळच दिला गेला पाहिजे. आपल्या व्यावसायिक फॅन पेज वर एखादा स्टेट्स अपडेट करण्यासाठी काही मिनीटे लागतात तेवढे झाल्यावर २-३ तासांनी कमेंट वाचणे आणि त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी अर्धातास पुरे व्हायला हवा. 

विद्यार्थी किंवा जे लोक फेसबुकचा वापर मित्र-मैत्रीणींना भेटण्यासाठी, त्यांच्याशी बोलण्यासाठी करतात अशांनी स्वत:वर काही निर्बंध घालणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त वेळ फेसबुकपासून दूर राहण्यासाठी इतर गोष्टींमध्ये मन रमविणे कधीही चांगले. वाटल्यास एखादा दिवस फेसबुकवर न जाता कुठेतरी बाहेर जाण्याचा प्रोग्राम केल्यास हळू हळू आपण या व्यवनातून मुक्त होऊ शकाल.
तंत्रज्ञान हे जीवन नक्कीच नाही. तंत्रज्ञानाचा वापर आपल्या आयुष्यातली कामे हलकी करण्यासाठी केला गेला पाहिजे. सोशल नेटवर्किंग किंवा फेसबुक हे वाईट नक्कीच नाही. सोशल नेटवर्किंगमुळे आपल्या अनेक नवनविन ओळखी होतात, मित्र भेटतात, बिझनेस कॉन्टॅक्ट वाढतात, कामे मिळतात तर याचा वापर चाणाक्षपणे केला गेला पाहिजे.