Showing posts with label Website. Show all posts
Showing posts with label Website. Show all posts

Tuesday, 1 February 2011

webmajha.com : फेब्रुवारी महिन्याचे पहिले अपडेट

वेबमाझा.कॉमचा हा केवळ दुसरा महिना. पहिल्या महिन्यात एकूण सहा लेख अपडेट केले. इंटरनेटवरुन या सर्व लेखांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला हे उपलब्ध आकड्यांवरुन समजतेय. संपूर्ण जानेवारी महिन्यात ११२३७ वेळा वेबसाईटच्या पेजेसना भेट दिल्या गेल्या.

या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात दोन लेख नविन आहेत.

महाराष्ट्राला आत्मभान देणारा क्रांतिकारक विचारवंत प्रबोधनकार ठाकरे यांच्यावर काही महिन्यांपूर्वी वेबसाईट श्री. सचिन परब यांनी तयार केली. प्रबोधनकारांचे विचार ज्या पुस्तकांमध्ये साठविले गेले आहेत ते एकतर आज सहजच कुठेही उपलब्ध नाहीत किंवा आमच्या मराठी माणसाने त्यांच्याबद्दल जास्त वाचन केलेच नाही. प्रबोधनकार.कॉम कशी बनली यावर खुद्द सचिन परब यांनी लिहिलेला लेख आहे.

प्रबोधनकार डॉट कॉमची गोष्ट
http://www.webmajha.com/article.php?prabodhankar-dot-com

इंटरनेटच्या युगात अनेक ऑनलाईन शॉपिंगच्या साईटस उपलब्ध आहेत. आपण सर्वजण हे बघत असतो, परंतु कधी या वेबसाईटवरुन खरेदी करतो का? जर करत असू तर आपल्याला एकूण या पध्दतीची माहिती असेल परंतु आजही अनेक इंटरनेट वापरणारे ऑनलाईन शॉपिंग करताना घाबरतात. रोजच्या वर्तमानपत्रात सायबर गुन्ह्यांच्या बातम्या वाचनात येतात, त्यामुळे साहजिकच आहे सर्वसामान्य माणूस या गोष्टींपासून दूर राहतो. परंतु सायबर गुन्हे हे आता इतके सोप्पे राहिलेले नाहीत की कुठल्याही साईटवरुन आपल्या खात्याची चोरी होऊ शकते. यावरच थोडक्यात माहिती देण्याचा मी प्रयत्न केलाय.

ऑनलाईन शॉपिंग करु या!
http://www.webmajha.com/article.php?online-shopping

Sunday, 30 January 2011

World Cup Cricket Tickets ऑनलाईन खरेदी करा

वर्ल्ड कप क्रिकेट या फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे यावेळेस वर्ल्डकप आपल्या देशात होत आहे त्यामुळे क्रिकेट हा धर्म ज्या देशाचा आहे अशा देशात मैदाने तुडूंब भरणार याबद्दल शंकाच नाही.

आयसीसीने वर्ल्डकप सामन्यांची तिकीट विक्री ऑनलाईन सुरु केलेली आहे. क्याझुंगा.कॉम या वेबसाईटवरुन प्रक्टीस मॅचपासून ते वर्ल्डकप फायनलपर्यंतची तिकीटविक्री होणार आहे. मैदान तुडूंब भरणार म्हणजेच मैदानात जाऊन तिकीट विकत घेणे केवळ अशक्य आहे तेव्हा घरबसल्या तिकीट घेणे अतिशय सोप्पे आहे.

तिकीट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर भेट देऊ शकता:

batmya.com : ऑनलाईन मराठी बातम्या वाचा


रोज सकाळी अनेकजण ऑनलाईन आल्यानंतर बातम्या वाचण्यासाठी वेगवेगळ्या वृत्तपत्र किंवा न्युज चॅनेलच्या वेबसाईटसना भेट देत असतात. ठळक बातम्या वाचायच्या असतील तर प्रत्येक वेबसाईटवर जाणे अतिशय वेळकाढूपणा आणि तापदायक असते. सहजच इंटरनेटची सफर करत असताना ‘बातम्या.कॉम’ नावाची एक वेबसाईट पाहिली, सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स तसेच काही इंग्रजी सारख्या वृत्तपत्रांच्या ठळक बातम्या, मराठी व इंग्रजी वृत्तपत्र, न्युज चॅनेलच्या वेबसाईटसचे पत्ते सुद्धा या साईटवर दिलेले आहेत.

एकदा बघून तर घ्या : बातम्या.कॉम




Monday, 17 January 2011

वेबमाझा.कॉम : वेबसाईट अपडेट

१ जानेवारी २०११ पासून ‘वेबमाझा.कॉम’ ही वेबसाईट नविन स्वरुपात सुरु केली. प्रतिभावान मराठी तरुण, यशस्वी मराठी माणूस, संस्था किंवा संघटना यांचा इंटरनेटवरुन व्यासपीठ उपलब्ध करुन देणे हे माझे सर्वात पहिले उद्दिष्ट आहे. हाच उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून मागच्या अंकात एका गरीब कुटूंबातून येऊन आज सहकार क्षेत्रात खुपच चांगला जम बसविले आहे अशा आनंद माईंगडे यांच्यावरील लेख अनेकांना आवडला. आपल्या सर्वांच्या अशाच चांगल्या प्रतिसादानेच मला हे सगळे लिहिण्यासाठी हुरुप मिळणार आहे म्हणुन वेबमाझावरील लेखांवरील आपल्या सूचना किंवा प्रतिक्रिया द्यायला बिलकुल विसरु नका.

आताच्या नविन अंकात पुन्हा तीन नविन लेखांचा समावेश आहे. त्यातील एक नेहमीप्रमाणे मुख्य उद्दीष्टाला धरुन आहे. ‘भाडेकरु संघ महामंडळ’ ही संघटना खुप चांगले काम करत असून त्यांच्याबद्दलची माहिती अनेकांना नसल्यामुळे मला त्यांच्याबद्दलचा हा लेख लिहावास वाटला, अनेक जण आपल्या आयुष्यातील महत्वाचा वेळ कुठल्यातरी ध्येय्यासाठी देत असतात, त्यातच सामाजासाठी काही करण्याचे ज्यांचे ध्येय्य असते अशांना त्यातुन किती पैसे मिळतात याच्याशी देणेघेणे नसते त्यांच्या डोळ्यासमोर असते ते फक्त ध्येय्य!

खाली लेखांच्या लिंक्स दिलेल्या आहेत, अपेक्षा करतो आपण आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया नक्की द्याल!

भाडेकरु संघ महामंडळ : 
http://www.webmajha.com/article.php?tenants-association

विकिपीडिया मराठी ज्ञानकोष : 
http://www.webmajha.com/article.php?marathi-wikipedia

सायबर पोलिसांची नजर तुमच्यावर आहे : 
http://www.webmajha.com/article.php?cyber-cell

Wednesday, 12 January 2011

डब्बेवाल्यांच्या नावाने पैसा खाणारा भुरटा चोर


माहिती तंत्रज्ञानाची भुरळ आज सर्वांनाच आहे. सोशल नेटवर्किंगमुळे जग खुपच छोटे झालेले आहे. माहितीचा खजिना एका क्लिकसरशी सर्वांसमोर खुला होत आहे. यातूनच काहींनी आपला धंदासुद्धा थाटला आहे. त्याद्वारे अमाप पैसा गोळा करण्याच्या मशिन तयार झाल्या आहेत. असेच काहीसे प्रकरण घडलेय ते मुंबईच्या प्रामाणिक डब्बेवाल्यांबरोबर!

डब्बेवाल्यांची किर्ती जगभरात पोहचत होती. जगातील सर्वात कुशल मॅनेजमेंट गुरु म्हणून डब्बेवाल्यांना प्रसिद्धी मिळत होती. याचाच फायदा घेऊन एक इंजिनीयर मनिष त्रिपाठी याने डब्बेवाल्यांसमोर वेबसाईटच्या माध्यमातून आपण करत असलेले काम जगभरात वेबसाईटच्या माध्यमातून पोहचवण्याची संकल्पना मांडली व मार्च २००६ मध्ये  www.mydabbawala.com नावाची वेबसाईट बनविली. जगभरातील दोन कोटी लोकांनी या वेबसाईटला भेट दिलेली असून डब्बेवाल्यांना मदत व्हावी या हेतूने लाखो रुपयांची देणगीसुद्धा दिलेली आहे.

दरम्यान मनिष त्रिपाठी डब्बेवाल्यांवर जगभरात डब्बेवाला या विषयावर व्याख्यान देत असे. डब्बेवाल्यांच्या हितासाठी काम करत असल्याचे तो सांगत होता. स्वत: डब्बे हातात घेऊन फोटो काढून विझिटींग कार्ड सुद्धा छापले होते. स्वत:च डब्बेवाला बनून जगभरात फिरुन जमा झालेली निधी स्वत:च्याच खिशात टाकण्याचे काम हा करीत असे. डब्बेवाल्यांच्या संघटनेने मनिष त्रिपाठीवर रितसर सायबर क्राईम पोलिसांमध्ये तक्रार केली असून पोलिसांनी या मनिष त्रिपाठी नावाच्या भुरट्या चोराला अटक केलेली आहे.

Friday, 7 January 2011

विकीपिडीयन मेळावा


१५ जानेवारी विकीपिडीय़ा दहावा वर्धापन दिन साजरा करत आहे. १५ जानेवारी हा दिवस विकीपिडीया दिन म्हणून ओळखला जातो. हेच निमित्त साधून मुंबईतील विकीपिडीयनसाठी मिटींग आयोजित करण्यात आलेली आहे. 

वेळ : शनिवार दिनांक १५ जानेवारी २०११, सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत.
स्थळ : व्हीजेटीआय, माटुंगा, मुंबई – ४०० ०१९.

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून यासाठी कुठल्याही प्रकारची फीस आकारली जाणार नाही. आपल्यातून जे या कार्यक्रमाला येण्यासाठी इच्छुक आहेत अशांनी खालील लिंकवर आपल्या नावाची नोंद करावी.

Wednesday, 5 January 2011

महायोगी गगनगिरी


आज कामानिमित्त क्लाईंटकडे गेलो असता त्यांना त्यांच्या आश्रमाची वेबसाईट बनवायची आहे तर त्यासाठी गुगल करताना अतिशय सुंदर वेबसाईट बघण्यात आली. gagangiri.org ही वेबसाईट बघता क्षणी मला खुप खुप आवडली. वेबसाईटची अतिशय देखणी आणि सुटसुटीत मांडणी असून त्यावरील माहितीसुद्धा खुपच चांगल्याप्रकारे मांडलेली आहे.

गगनगिरी महाराजांवरील ही वेबसाईट बघता बघता थोडेफार वाचत गेलो आणि गगनगिरी महाराजांबद्दलची चांगल्यापैकी माहिती या वेबसाईटवरुन मिळाली. गगनगिरी महाराजांनी केलेली कामे, इतिहास, महासमाधी ही खुप चांगली माहिती साईटवर दिलेली असून काही विचारसुद्धा प्रत्येक पानावर मांडलेले आहेत.

आज जास्त काही लिहित नाही, पण आज ही वेबसाईट पाहिली आणि आपल्याला सुद्धा देखण्यासाईटबद्दल माहिती द्यावी यासाठी हा लिहीण्याचा प्रपंच केला.