Showing posts with label Webmajha. Show all posts
Showing posts with label Webmajha. Show all posts

Wednesday, 2 March 2011

वेबमाझा.कॉम - मार्च महिन्याचे अपडेट

मागचे अनेक दिवस ब्लॉग अपडेट केलेला नाही. इतर कामात व्यस्त असल्यामुळे म्हणणार नाही, कारण कामातून वेळ काढून अशा गोष्टी केल्या पाहिजेत असे मनापासून वाटते. असो उगाच यात वेळ नाही घेत.

वेबमाझा यावेळची अपडेट तशी एक दिवस उशीरा करतोय. वेबसाईटचे फायनल डिजाइन पूर्ण व्हायला वेळ गेल्याने हा वेळ झाला. यावेळेस वेबमाझावर मराठीतील एका प्रगत तंत्रज्ञानाने भरपूर अशा मानबिंदू.कॉम बद्दल मी स्वत: लिहीले आहे. काही ठिकाणी योगेशने माहिती दिलीय त्यासाठी योगेशचे आभार मानतो. आम्ही शिल्पकार उद्याचे हे मानबिंदूचे ब्रिदवाक्य आहे. त्यानुसार मराठी कलाकारांसाठी ही वेबसाईट काम करतेय. वेबसाईटवरील माहिती ही अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत मांडलेली आहे. त्यामुळे वाचकांनाही ही वेबसाईट खुप आवडतेय.

वेबमाझावर यावेळेस मानबिंदू यासाठीच कारण योगेशची मेहनत जवळून पाहिलेल्यांपैकी मी एक आहे. खुप चांगल्या पगाराची, चांगल्या हुद्दयाची नोकरी सोडून आज योगेश फुलटाईम या वेबसाईटला देत आहे. मला योगेशबद्दल मुळीच सांगायचे नाही पण त्याच्या मेहनतीचा उल्लेख लेखामध्ये न करण्याचे त्यानेच सांगितले होते म्हणून ब्लॉगवर चान्स मारला.

असो, मानबिंदूचे यावेळेचे विशेष हेच की, आता आपण मानबिंदूवरून पैसे सुध्दा कमावू शकतो. तुमची वेबसाईट, ब्लॉग किंवा तुमच्या फेसबुक खात्यावरुनही हे शक्य आहे. मानबिंदूवरील उत्पन्न मिळवा मध्ये याची सविस्तर माहिती आहे. आपण जरूर या आपल्या मराठी साईटवरील अनोख्या संधीचा फायदा घ्या.

आम्ही शिल्पकार उद्याचे या लेखाची लिंक खाली देत आहे

Tuesday, 1 February 2011

webmajha.com : फेब्रुवारी महिन्याचे पहिले अपडेट

वेबमाझा.कॉमचा हा केवळ दुसरा महिना. पहिल्या महिन्यात एकूण सहा लेख अपडेट केले. इंटरनेटवरुन या सर्व लेखांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला हे उपलब्ध आकड्यांवरुन समजतेय. संपूर्ण जानेवारी महिन्यात ११२३७ वेळा वेबसाईटच्या पेजेसना भेट दिल्या गेल्या.

या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात दोन लेख नविन आहेत.

महाराष्ट्राला आत्मभान देणारा क्रांतिकारक विचारवंत प्रबोधनकार ठाकरे यांच्यावर काही महिन्यांपूर्वी वेबसाईट श्री. सचिन परब यांनी तयार केली. प्रबोधनकारांचे विचार ज्या पुस्तकांमध्ये साठविले गेले आहेत ते एकतर आज सहजच कुठेही उपलब्ध नाहीत किंवा आमच्या मराठी माणसाने त्यांच्याबद्दल जास्त वाचन केलेच नाही. प्रबोधनकार.कॉम कशी बनली यावर खुद्द सचिन परब यांनी लिहिलेला लेख आहे.

प्रबोधनकार डॉट कॉमची गोष्ट
http://www.webmajha.com/article.php?prabodhankar-dot-com

इंटरनेटच्या युगात अनेक ऑनलाईन शॉपिंगच्या साईटस उपलब्ध आहेत. आपण सर्वजण हे बघत असतो, परंतु कधी या वेबसाईटवरुन खरेदी करतो का? जर करत असू तर आपल्याला एकूण या पध्दतीची माहिती असेल परंतु आजही अनेक इंटरनेट वापरणारे ऑनलाईन शॉपिंग करताना घाबरतात. रोजच्या वर्तमानपत्रात सायबर गुन्ह्यांच्या बातम्या वाचनात येतात, त्यामुळे साहजिकच आहे सर्वसामान्य माणूस या गोष्टींपासून दूर राहतो. परंतु सायबर गुन्हे हे आता इतके सोप्पे राहिलेले नाहीत की कुठल्याही साईटवरुन आपल्या खात्याची चोरी होऊ शकते. यावरच थोडक्यात माहिती देण्याचा मी प्रयत्न केलाय.

ऑनलाईन शॉपिंग करु या!
http://www.webmajha.com/article.php?online-shopping

Monday, 17 January 2011

वेबमाझा.कॉम : वेबसाईट अपडेट

१ जानेवारी २०११ पासून ‘वेबमाझा.कॉम’ ही वेबसाईट नविन स्वरुपात सुरु केली. प्रतिभावान मराठी तरुण, यशस्वी मराठी माणूस, संस्था किंवा संघटना यांचा इंटरनेटवरुन व्यासपीठ उपलब्ध करुन देणे हे माझे सर्वात पहिले उद्दिष्ट आहे. हाच उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून मागच्या अंकात एका गरीब कुटूंबातून येऊन आज सहकार क्षेत्रात खुपच चांगला जम बसविले आहे अशा आनंद माईंगडे यांच्यावरील लेख अनेकांना आवडला. आपल्या सर्वांच्या अशाच चांगल्या प्रतिसादानेच मला हे सगळे लिहिण्यासाठी हुरुप मिळणार आहे म्हणुन वेबमाझावरील लेखांवरील आपल्या सूचना किंवा प्रतिक्रिया द्यायला बिलकुल विसरु नका.

आताच्या नविन अंकात पुन्हा तीन नविन लेखांचा समावेश आहे. त्यातील एक नेहमीप्रमाणे मुख्य उद्दीष्टाला धरुन आहे. ‘भाडेकरु संघ महामंडळ’ ही संघटना खुप चांगले काम करत असून त्यांच्याबद्दलची माहिती अनेकांना नसल्यामुळे मला त्यांच्याबद्दलचा हा लेख लिहावास वाटला, अनेक जण आपल्या आयुष्यातील महत्वाचा वेळ कुठल्यातरी ध्येय्यासाठी देत असतात, त्यातच सामाजासाठी काही करण्याचे ज्यांचे ध्येय्य असते अशांना त्यातुन किती पैसे मिळतात याच्याशी देणेघेणे नसते त्यांच्या डोळ्यासमोर असते ते फक्त ध्येय्य!

खाली लेखांच्या लिंक्स दिलेल्या आहेत, अपेक्षा करतो आपण आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया नक्की द्याल!

भाडेकरु संघ महामंडळ : 
http://www.webmajha.com/article.php?tenants-association

विकिपीडिया मराठी ज्ञानकोष : 
http://www.webmajha.com/article.php?marathi-wikipedia

सायबर पोलिसांची नजर तुमच्यावर आहे : 
http://www.webmajha.com/article.php?cyber-cell