Sunday 20 February, 2011

बांग्लादेशला आपण चिरडायला हवे होते

काल आपण बांग्लादेशवर एक मोठा विजय मिळवून विश्वचषकाची सुरूवात अगदी दणक्यात केलेली आहे. जणू १७ फेब्रुवारीचा उद्धाटन सोहळा अजून संपला नव्हता. विरूने मागच्या विश्वचषकाचा वचपा काढायचा होता तो अशा प्रकारे असेल याची कुणीही कल्पना केलेली नसेल. विराट कोहलीबद्दल काही न बोललेले बरे आहे, हा गडी एकदिवसीय सामने खेळायला लागल्यापासून विकेटवर सेट झालेला आहे. विराटने मागच्या २०१० वर्षात ९९५ धावा केल्यात आणि या वर्षाची सुरूवात त्याने दक्षिण आफ्रिकेतून केलेली आहे.

हा विश्वचषक हिंदुस्थानच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. सचिनचा शेवटचा विश्वचषक असल्याने तो सचिनसाठी जिंकला जावा अशी तमाम हिंदुस्थानवासियांची भावना आहे, आणि विरूच्या खेळीतून हे स्पष्ट झाले. यापूर्वी विश्वचषक आयोजक देश स्पर्धा जिंकत नसत, पण १९९६ला श्रीलंकेने हे खोडून काढलेय. मागचा उपखंडातील विश्वचषक श्रीलंका जिंकू शकते तर आता आपणही जिंकलोच पाहिजे, असे म्हणणे चुकीचे नाही.

काल सकाळी वर्तमानपत्रातील विश्वचषकाचे बांग्लादेशाविरूध्दच्या २००७ च्या सामन्याबाबत लिहिलेले होते. बांग्लादेशाविरूध्दची हि चिड गेली ४ वर्षे प्रत्येक हिंदुस्थानींच्या मनात जखम करून बसली होती, या विश्वचषकात ही संधी उद्घाटनाच्या सामन्यात चालून आली. अपेक्षेप्रमाणे फलंदाजीमध्ये आपण बांग्लादेशाला अक्षरश: बुकलून काढलेले आहे. एखाद्या सामन्यात ३७० धावा काढणे हे कधीच सोप्पे नसते. पण तरीही विजयाची किमान अपेक्षा १०० धावांची होती ती काही पूर्ण करू शकलो नाही. विजय हा विजय असतो, मग तो १ धावेने का असे ना विजयाचे महत्व कधीच कमी जास्त नसते.  असो आपली गोलंदाजी हा कच्चा दुवा आहेच, आणि खिशात ३७० धावा असताना अशा चुका सुधारण्याची संधी नक्कीच आहे.

पहिला सामना जिंकून आपण विश्वचषकाची सुरूवात खुप चांगली केलेली आहे. आता पुढेही चांगला खेळ करून विश्वचषक जिंकावा यासाठी आपल्या संघाला मनापासून शुभेच्छा!

1 comment:

Ashish Sawant said...

अगदी बरोबर बोललास. मला तर वाटले होते कि आपण त्यांना २०० मध्येच गुंडाळायला हवे होते. पण आपली सुरवातीची गोलंदाजी पाहिजे तशी झाली नाही.
आपल्या टीम ने विजयोस्तव साजरा न करता आपल्या कमतरता शोधून काढल्या पाहिजेत.