Tuesday 11 January, 2011

१५ मार्चला फेसबुक बंद होणार?


काल रात्री विकली वर्ल्ड न्युजच्या वेबसाईटवर एक बातमी वाचून खरच धक्का बसला. १५ मार्चला फेसबुक बंद होणार अशा प्रकारची ही बातमी होती. फेसबुकवर लाखो लोक रोज भेट देत असतात, आपल्या मित्र-मैत्रींणींशी बोलत असतात, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतात.
या वेबसाईटवरील बातमीत म्हटले आहे की फेसबुकचा मालक मार्क झुकरबर्ग याच्याशी फोनवरुन झालेल्या बोलण्यात फेसबुक वेबसाईट चालवताना खुप त्रास होतोय, फेसबुक एका चांगल्या कारणासाठी सुरु केले होते पण आता फेसबुकमुळे घडणारी गुन्हेगारी खुपच अस्वस्थ करतेय. आयुष्यपूर्वीप्रमाणे जगता येत नाही त्यामुळे हे सगळे बंद करुन जीवनातील मजा लुटायची आहे. वैगेरे.. 

आता इथे प्रश्न उरतो तो म्हणजे ही बातमी खरी आहे की खोटी? खरचं वरील गोष्टी मार्कने बोलून दाखविल्या असतील? करोडो लोकांचे फेसबुकवरील अकांऊंट एका झटक्यात कोणी बंद करेल का? मार्क झुकरबर्गला फेसबुकमुळे होणारे उत्पन्न त्याला नको झालेय का? गुगलसारखी खुप मोठी कंपनी असताना थेट वेबसाईट बंद करण्याचा निर्णय कोणी घेऊ शकेल का? असे अनेक प्रश्न आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हल्लीच मार्क झुकरबर्गने नेक्स्ट जनरेशन ईमेल सुविधा फेसबुक सुरु करणार असल्याचे जाहिर केलेय, आणि इतका मोठा निर्णय एका फोन कॉलवरुन होऊ शकेल?

मला तरी वाटते असे काहीही होणार नाही, काही खोडसाळ लोकांनी प्रसिद्धीच्या मोहापायी पसरविलेली ही अफवा असेल. जगातील सर्वात जास्त लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट बंद होऊच शकत नाही. पैसा कुणाला नकोय? असो ही सर्व वायफळ चर्चा जोपर्यंत स्वत: मार्क झुकरबर्ग किंवा फेसबुकमधील कोणी वरिष्ठ सांगत नाही तोपर्यंत सुरुच राहणार.

No comments: