Sunday 13 February, 2011

प्रेमात हे उकिरड्यावरचे चाळे कशाला?

उद्या वॅलेंटाईन डे म्हणजे आपल्या इथल्या तथाकथित प्रेमवीरांसाठी प्रेमाचा दिवस. या दिवशी प्रेयसी आणि प्रियकर भेटतात, एकमेकांना शुभेच्छा देतात आणि काय काय करतात हे सर्वांना माहितच आहे. लग्नानंतर हा आनंद उपभोगायचा हा दुसरा हक्काचा दिवस असेही अनेक प्रेमवीरांचे मत आहे. नव्हे केवळ याचसाठी हा दिवस साजरा करणा-यांचा आकडा मोठा आहे असे प्रत्यक्षात तरी दिसते.


वॅलेंटाईन कोण होता? ही माहिती शोधण्याचा प्रयत्न केला तर तशी छातीठोकपणे सांगता येईल अशी माहिती उपलब्ध नाहिये. विकीपिडीयावर माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तो खाली देत आहे, यातून तुम्हाला जे कळते तितके घ्या :
Numerous early Christian martyrs were named Valentine The Valentines honored on February 14 are Valentine of Rome (Valentinus presb. m. Romae) and Valentine of Terni (Valentinus ep. Interamnensis m. Romae). Valentine of Rome was a priest in Rome who was martyred about AD 269 and was buried on the Via Flaminia. His relics are at the Church of Saint Praxed in Rome, and at Whitefriar Street Carmelite Church in Dublin, Ireland.
Valentine of Terni  became bishop of Interamna (modern Terni) about AD 197 and is said to have been martyred during the persecution under Emperor Aurelin. He is also buried on the Via Flaminia, but in a different location than Valentine of Rome. His relics are at the Basilica of Saint Valentine in Terni (Basilica di San Valentino).
 The Catholic Encyclopedia also speaks of a third saint named Valentine who was mentioned in early martyrologies under date of February 14. He was martyred in Africa with a number of companions, but nothing more is known about him.
No romantic elements are present in the original early medieval biographies of either of these martyrs. By the time a Saint Valentine became linked to romance in the 14th century, distinctions between Valentine of Rome and Valentine of Terni were utterly lost.
In the 1969 revision of the Roman Catholic Calendar of Saints, the feastday of Saint Valentine on February 14 was removed from the General Roman Calendar and relegated to particular (local or even national) calendars for the following reason: "Though the memorial of Saint Valentine is ancient, it is left to particular calendars, since, apart from his name, nothing is known of Saint Valentine except that he was buried on the Via Flaminia on February 14."  The feast day is still celebrated in Balzan (Malta) where relics of the saint are claimed to be found, and also throughout the world byTraditionalist Catholics who follow the older, pre-Second Vatican Council calendar.
बरं या वॅलेंटाईन डे पाळणा-यांना याबद्दलची चांगली माहिती असेल ती त्यांनी देण्याचा प्रयत्न करावा.
आपल्याकडे एक टूम आहे. आपल्या इतिहासातील ज्या गोष्टींची माहिती व्यवस्थित उपलब्ध नसेल तर त्यावर वाद घालत बसायचे. मग ती शिवाजी महाराजांची जयंती असो नाहितर दादोजी कोंडदेव असोत. मग हेच या वॅलेंटाईनला लागू पडत नाही?
शिवसेनेचा विरोध योग्य कसा?
शिवसेना गेली अनेक वर्षे वॅलेंटाईन दिवसाला विरोध करतेय. ज्या संघटनेचा पायाच मुळी तरूणांवर अवलंबून आहे, अशा संघटनेने वॅलेंटाईन डेला विरोध करणे हे खरचं कौतुकास्पद आहे. पण केवळ विरोधाला विरोध करायचा म्हणून डोळे बंद करून काहीही करायचे कितपत योग्य आहे. वॅलेंटाईन डे ला प्रेमाखातर जे कृत्य केले जातात त्याला जबाबदार कोण? आयुष्यात प्रेम करणे वाईट नाही, पण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, तिच्याशी त्यावेळेपुरते असले चाळे करायचे आणि वा-यावर सोडायचे हे योग्य नाही. आपल्या मुलीची इज्जत भरून येणार नाही या भितीने या विरोधात समोर न येणा-या पालकांचे समजू शकतो.
तरुणांनो डोळे उघडा, आपण प्रेम करता ना? मग ते पुर्णपणे करा. असे प्रेम करा, जे आयुष्यभर आपल्यासोबत राहिल. उकिरड्यावरचे चाळे करून प्रेमाला बदनाम करु नका.

No comments: