विश्वचषक सामन्यांमध्ये आता चुरश यायला सुरूवात झालीय. कालच्या सामना यापूर्वी विश्वचषकात झालेल्या सामन्यांमधला सर्वात जास्त लक्षात राहणारा असेल. पुढे आता आणखी इतर छोटे संघ कसा खेळ करतात यावर स्पर्धेत कोण टिकणार कोण जाणार हे नक्की होईल. उपांत्य फेरीत जाणारा संघ कोण असेल त्यासाठी नेट रन रेट चांगला असायला हवा का? नेट रन रेट कसा काढला जातो हेच या लेखातून मला सांगायचेय.
आपण हिंदुस्थानचा नेट रन रेट काढू यात. नेट रन रेट काढताना एखाद्या संघाने स्पर्धेत किती षटकांमध्ये किती धावा काढल्या आणि समोरील संघांला किती षटकांत किती धावा काढू दिल्या (म्हणजेच खेळलेल्या प्रत्येक सामन्यांच्या रनरेटमधून काढले जाते) याची वजाबाकी करून जे उत्तर येते तेच नेट रन रेट असते. उदा. हिंदुस्थानने विश्वचषकातील दोन सामन्यांमध्ये (बांग्लादेश विरूध्द ५० षटकांत ३७० धावा + इंग्लंड विरूध्द ५० षटकांत ३३८ धावा ) १०० षटकांत ७०८ धावा केल्यात, आता ७०८ ला १०० ने भागले असता हिंदुस्थानचा स्पर्धेतील रनरेट ७.०८० असे येते. आता हिंदुस्थानविरूध्द (बांग्लादेश ५० षटकांत २८३ धावा आणि इंग्लंडने ५० षटकात ३३८ धावा) १०० षटकांत ६२१ धावा कुटल्या गेल्या म्हणजेच ६.२१० च्या रनरेटने या धावा प्रतिस्पर्धी संघाने काढल्या. आता काढलेल्या रनरेटमधून दिलेले रनरेट वजा केल्यावर हिंदुस्थानचा नेट रनरेट ०.८७० असा येतो.
विश्वचषकातील पुढील लढतीत कदाचित याची आपल्याला गरज लागलीच तर अशाप्रकारे आपल्याकडे आकडे तयार असणे गरजेचे आहे.
1 comment:
zakaas amitji..........
good information..............
i hope india will not need this.....
Post a Comment